Pune zp news | पुणे जिल्हा परिषदेच्या कायदेशीर सल्लागारपदी ॲड. संजय पानमंद यांची निवड
खेड वकील बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष; २१ वर्षांचा वकिली क्षेत्रातील अनुभव, दिवाणी प्रकरणांमध्ये विशेष प्राविण्य; सामाजिक, राजकीय व विधी क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव.
महावार्ता लाईव्ह | खेड तालुका वकील बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष व पुणे लॉयर्स कंझ्युमर को-ऑप सोसायटीचे संचालक ॲड. संजय सुदामराव पानमंद यांची पुणे जिल्हा परिषदेवर कायदेशीर सल्लागार म्हणून निवड झाली. निवडीबद्दल सर्व क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनासह शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
निवडीचे नियुक्तीपत्र माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पुणे जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सदस्या सुनिता शरद बुट्टे पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.

तसेच खेड जिल्हा व सत्र न्यायालयात आयोजित कार्यक्रमामध्ये जिल्हा व सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ए. एस. सय्यद व ए. पी. कानडे आणि खेड वकील असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अतुल गोरडे यांनी ॲड. संजय पानमंद यांची निवड झाल्याबद्दल खेड वकील संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार केला. यावेळी खेड वकील बार असोसिएशनचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

ॲड. संजय पानमंद हे खेड वकील असोसिएशनचे माजी अध्यक्ष असून पुणे जिल्हा लॉयर्स कंझ्युमर सोसायटीचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. वकिली व्यवसायामध्ये २१ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. ॲड. पानमंद हे खेड व पुणे जिल्ह्यातील जिल्हा व सत्र न्यायालयात वकिली व्यवसाय करीत असून दिवाणी क्षेत्रामध्ये त्यांचे विशेष प्राविण्य आहे.
पुणे जिल्हा परिषदेवर कायदेशीर सल्लागार म्हणून निवड झाल्याबद्दल ॲड. संजय पानमंद यांचे सामाजिक, राजकीय आणि विधी क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.