राजगुरूनगर शहरात अतिक्रमण विरोधी कारवाई

अचानक कारवाई झाल्याने शहरातील छोटे व्यावसायिक यांची धावपळ : अतिक्रमण स्वतः काढून घेतो प्रशासनाकडे केली विनवणी

राजगुरूनगर शहरात अतिक्रमण विरोधी कारवाई

राजगुरूनगर - राजगुरूनगर नगरपरिषद हद्दीतील रस्त्याच्या कडेने वाढलेले आणि रहादरीस अडथळा ठरणारे अनधिकृत अतिक्रमण राजगुरूनगर नगरपरिषद प्रशासन आणि पोलीस यांच्या संयुक्त कारवाईने अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली.

 

अतिक्रमण कारवाईला सुरवात सकाळी ११ वाजता पाबळरोड येथील फ्रुटवाले यांच्यापासून झाली.आम्हाला पर्यायी जागा द्यावी आम्ही आमचे फ्रुटचे गाडे हटविणार नाही असा पवित्रा फ्रुटवाले यांनी घेतला.अतिक्रमण दुपारपर्यंत काढा अशी मुदत दिल्यावर सर्व फुटवाले,पान टपरी,वडापाव स्टॉलधारकांनी स्वतः केलेले अतिक्रमण काढल्याने त्यांच्यावरील कारवाई टळली.
त्यानंतर अतिक्रमण विरोधी पथकाचा मोर्चा जुना मोटर स्टॅन्ड, मच्छी मार्केट,श्रीरामलाईन पासून साई अमृततुल्य इथपर्यंत दुकानासमोरील शेड व ओटे काढण्यात आली.त्यानंतर अतिक्रमण कारवाईचा बडगा हौद ओढा व भाजी बाजार पासून पुढे मारुती ढाळ वरून पुढे सरकला.

 

दिलावर खान दर्गा समोरील अतिक्रमण केले होते त्यांनी स्वतः काढले. यानंतर मुख्य कारवाई वाडारोड व माताबाल संगोपन केंद्राच्या भिंतीलगत झालेले अतिक्रमण जेसीबी यंत्राचा बडगा उगारताच अनेकांनी केलेले अतिक्रमण स्वतः काढले. पाण्याचे टाकीपासून पुढे कोर्ट रोड ते नवीन भीमा नदीपर्यंत अतिक्रमण यावर कारवाई केली.कारवाई झाल्याने अनेक रस्त्यासह पादचारी मार्ग मोकळा झाला.अतिक्रमण कारवाईचे राजगुरूनगर शहरातील सामाजिक संस्था व नागरिकांनी स्वागत केले.

 

अतिक्रमण कारवाई करण्यासाठी नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत लाळगे व त्यांचा नगरपरिषद स्टाफसह कर्मचारी यांनी मेहनत घेतली.अतिक्रमण कारवाई यशस्वी करण्यासाठी सर्वात पुढे राजगुरूनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे अग्रभागी होते. केंद्रे यांनी कठोर भूमिका घेतल्याने अतिक्रमण केलेल्या अनेकांनी नांगी ताकत अतिक्रमण काढले.कारवाई दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांचा मोठा फौंजफाटा केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तैनात केला होता.कारवाई करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हे देखील सहभागी होते.अतिक्रमण जमीनदोस्त करण्यासाठी दोन जेसीबी यंत्र तर काढलेले अतिक्रमण पत्रे,टपऱ्या घेऊन जाण्यासाठी दोन तीन ट्रॅक्टरचा उपयोग करण्यात आला.