राक्षेवाडी ग्रामपंचायतीने घेतला महत्वाचा निर्णय.गावठाणात २४ तास पाणी पुरवठा सुरू.
राक्षेवाडी ग्रामपंचायतीने घेतला महत्वाचा निर्णय.गावठाणात २४ तास पाणी पुरवठा सुरू.
राजगुरूनगर :प्रतिनिधी
राक्षेवाडी (ता.खेड) ग्रामपंचायतीच्या परीसरात अनेक विकासकामांचे भूमिपूजन ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांचे हस्ते संपन्न झाले.राक्षेवाडी गावठाणांतील नागरिकांना २४ तास नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठीची पाणी योजना कार्यान्वित करण्यात आली.
मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधा अनुदान योजनेतून राक्षेवाडी हद्दीतील थिटेवाडी व सांडभोरवाडी येथे रस्त्याचे काँक्रीटीकरण कामांचे भूमिपूजन झाले.यावेळी बाजार समितीचे संचालक व ग्रामपंचायत सदस्य अशोक राक्षे,सरपंच सुरेखा राक्षे,उपसरपंच व उद्योजक मच्छिंद्र राक्षे,ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र सांडभोर,रवींद्र राक्षे,श्रद्धा सांडभोर,वैजयंता थिटे,चांगुणाबाई थिटे,सविता राक्षे, ग्रामविकास अधिकारी तुषार साळुंके,माजी सरपंच अर्जुन थिटे,शिवाजी थिटे,पांडुरंग सांडभोर,सुमन सांडभोर, काळूराम सांडभोर,सावळेराम थिटे,भिवसेन थिटे,अमित थिटे,महेश राक्षे आदी उपस्थित होते.
थिटेवाडी फाट्यापासून ते सायंबा मंदिरापर्यंत संपूर्ण रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याची मागणी थिटेवाडीच्या ग्रामस्थांनी भूमिपूजन प्रसंगी केली,असता रस्ता करण्याचे ठोस आश्वासन थिटेवाडी ग्रामस्थांना अशोक राक्षे,मच्छिंद्र राक्षे यांनी दिले.संपूर्ण रस्त्याचे काँक्रीटीकरण ही विकास प्रक्रिया टप्याटप्प्याने होणार आहे.
राक्षेवाडी गावासाठी नवीन पाणी योजनेला राष्ट्रीय जलजीवन मशीन योजनेमधून १ कोटी १४ लाख रुपये निधीची तरतूद होऊन कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली.योजनेला केंद्र व राज्य सरकारचा निधी असून नवीन पाणी साठवण टाकी बांधून विस्तारीत जलवाहिनी टाकली जाणार आहे.गावठाणातील नागरिकांना दिवसरात्र २४ तास पाणी पुरवठा योजना आजपासून कार्यान्वित करीत असल्याची घोषणा सरपंच,उपसरपंच व सदस्यांनी केली.२४ तास पाणी पुरवठा सुरू केल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला.
-----------------------------
गावात अनेक विकासकामे सुरू असून विकास प्रक्रियेने गाव पुढे जात आहे.गावात लोक वर्गणीतून मंदिराचे काम सुरू असून ग्रामस्थांसह समाजातील दानशूर व्यक्तींनी मंदिरासाठी मदत करावी.
अशोकदादा राक्षे-संचालक,बाजार समिती
-----------------------------
ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना सर्व सुविधा पुरविण्याचा आमचा प्रयत्न आहे.गावच्या परिसरात रस्त्यांचे जाळे विणले जाईल. नागरिकांनी घरपट्टी व पाणीपट्टी भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे.
सुरेखाताई राक्षे--सरपंच राक्षेवाडी
----------------------------------
राक्षेवाडी गावच्या क्षेत्रात नागरीकरण दिवसेंदिवस वाढत असताना ग्रामपंचायत नागरिकांना सुविधा पुरविण्याचा प्रयत्न करीत आहे.२४ तास पाणी पुरवठा करण्याचा निर्णय झाला असून लवकरच नवीन पाणी योजनेचे काम पूर्ण केले जाईल.
मच्छिंद्रशेठ राक्षे - उपसरपंच राक्षेवाडी
