श्री क्षेत्र भिमाशंकर श्रावण यात्रेसाठी पोलीस प्रशासनास सज्ज राहण्याच्या सूचना

वाढीव मिनीबस देण्याची मागणी | वाहनतळांची दुरूस्ती | व्हीआयपी दर्शनासाठी निर्बंध | अनेक विषयावर बैठकीत चर्चा

श्री क्षेत्र भिमाशंकर श्रावण यात्रेसाठी पोलीस प्रशासनास सज्ज राहण्याच्या सूचना

पुणे : श्री क्षेत्र भीमाशंकर श्रावण यात्रेच्या काळात पार्किंग व देवदर्शनाला जाणाऱ्या लोकांची लूट थांबविण्यासाठी प्रशासन व पोलिसांनी प्रयत्न करावे. एसटी महामंडळाने मिनी बसची संख्या वाढवून चांगली सेवा द्यावी. असे आवाहन प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी केले.

 

घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील तहसील कार्यालयात श्रावण महिन्यातील भीमाशंकर यात्रा आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी बैठकीस तहसिलदार संजय नागटिळक, प्रशांत बेडसे, सहायक गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे, सहायक पोलीस निरीक्षक किरण भालेकर, देवस्थान विश्वस्त मधुकर गवांदे, रत्नाकर कोडिलकर, दत्तात्रेय कौदरे, चंद्रकांत कौदरे, सरपंच दत्तात्रेय हिले, नायब तहसिलदार अनंता गवारी, दामुराजे असवले, बांधकाम विभागाचे सुरेश पठाडे, विद्युत मंडळाचे स्वप्निल काटकर उपस्थित होते. 

 

वाढीव मिनीबस देण्याची मागणी

वाहनतळ ते बसस्थानक या वाहतुकीसाठी मिनीबसचे नियोजन व वाहनतळ बनविणे हे महत्वाचे काम असते. एसटी महामंडळाने मिनीबस मुबलक प्रमाणात देण्यात याव्या अशी मागणी प्रांताधिकारी गोंविद शिंदे यांनी केली. 

 

वाहनतळांची दुरूस्ती

वाहनतळांवर आवश्यक त्याठिकाणी मुबलक प्रमाणात मुरूम टाकावा तसेच भीमाशंकर मंदिराकडे जाणाऱ्या पायरी मार्गाचे काम सुरू असल्याने सध्या छोट्या रस्त्याने भाविकांना मंदिराकडे जावे लागत आहे. हा पायरी मार्ग लवकर सुरू करावा, अशी मागणी देवस्थानच्या पदाधिका-यांनी केली. 

 

व्हीआयपी दर्शनासाठी निर्बंध

भीमाशंकरमध्ये व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली एका व्हिआयपीच्या दररोज ३ ते ४ गाडया येतात. त्या गाडया वाहनतळांपासून मंदिराकडे सोडल्यानंतर वाहनतळांवर उपस्थित असलेले भाविक पोलीस प्रशासनाबरोबर वाद घालत आहे. त्यामुळे व्हीआयपी दर्शनासाठी येणाऱ्यांवर निर्बंध आणावेत किंवा त्यांनाही वाहनतळांवर त्यांच्या गाडया लावून इतर वाहनाने मंदिराकडे न्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

श्रावण महिन्याच्या तारखा
एकूण - पाच सोमवार
५, १२, १९, २६ ऑगस्ट.
२ सप्टेंबर.