Khed | राजगुरू महाविद्यालयात योग दिनानिमित्त व्याख्यान व योग प्रात्यक्षिकांचे आयोजन
योगामुळे ज्ञान व आरोग्य चांगले राहत असून सर्वच वयोगटातील व्यक्तींना योगसाधनेची गरज - सागर गाडे
राजगुरुनगर : जागतिक योग दिनाचे औचित्य साधून हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात व्याख्यान व योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करून योग दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. सागर गाडे यांनी योग आणि मानवी आरोग्य या विषयावर मार्गदर्शन केले.
योगामुळे ज्ञान व आरोग्य चांगले राहत असून सर्वच वयोगटातील व्यक्तींना योगसाधनेची गरज आहे. मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी योगासने प्रभावी असून योग हा सर्वांच्या जगण्याचा भाग व्हायला हवा असे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी उपस्थितांकडून योगाचे प्रात्यक्षिक करून घेतले.यावेळी अनमोल इंगळे या विद्यार्थ्यांने रिदमिक योगाचे प्रात्यक्षिक सादर केले.
याप्रसंगी प्राचार्य डॉ.शिरीष पिंगळे, साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एच. एम. जरे, उपप्राचार्य डॉ. व्ही.डी.कुलकर्णी, डॉ.प्रतिमा लोणारी, डॉ. योगेश वाळुंज, डॉ. प्रभाकर जगताप, प्रा.योगेश मोहिते, प्रा. सारिका गोरे, प्रा. तानाजी पिंगळे तसेच राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना व क्रीडा विभागातील विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. प्रतिमा लोणारी यांनी तर आभार डॉ. गणेश आहेरकर यांनी मानले.
