केंद्र सरकारच्या विविध योजना लोकहिताच्या : आदिवासी कार्यमंत्री रेणुका सिंह

भाजपाचे जिल्हा परिषदेमधील गटनेते शरद बुट्टे पाटील यांनी खेड तालुक्यातील विमानतळ ,पुणे नाशिक रोड , पुणे नाशिक रेल्वे आदी प्रश्न सोडवण्याची रेणुका सिंह यांना विनंती केली.

केंद्र सरकारच्या विविध योजना लोकहिताच्या : आदिवासी कार्यमंत्री रेणुका सिंह

राजगुरुनगर : नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने सुरू केलेल्या लोकहिताच्या सर्व योजना मध्यस्तांचे उच्चाटन करणाऱ्या असून लाभार्थ्यांच्या खात्यात थेट अनुदान जमा करणारे आहेत. यातून भ्रष्टाचाराला मूठ माती देण्याचा प्रयत्न असून सामान्य लोकांच्या जीवनात चांगले दिवस आणण्यासाठी केंद्र सरकार काम करत आहे. आशा भावना भारत सरकारच्या आदिवासी कार्यमंत्री रेणुका सिंह संतोषनगर (ता.खेड) येथील केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थी संवाद कार्यक्रमात व्यक्त केल्या.

पुणे जिल्हा परिषदेतील भाजपाचे गटनेते शरद बुट्टे पाटील यांनी या लाभार्थी संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले. शिरूर लोकसभा मतदारसंघात रेणुका सिंह यांचा तीन दिवसाचा दौरा आयोजित करण्यात आला असून त्यानिमित्ताने त्यांनी या कार्यक्रमात लाभार्थी संवाद साधला.

प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्यमान भारत, सुकन्या समृद्धी योजना, उज्वला गॅस योजना, जलजीवन मिशन, पी एम किसान योजना यास विविध योजनांच्या लाभार्थ्यांची त्यांनी यावेळी संवाद साधून त्यांना कशाप्रकारे लाभ मिळाला आहे याबद्दल माहिती घेतली.

यावेळी शेतकरी आणि महिलांनी मिळालेल्या विविध योजनांच्या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे आभार मानणारे पत्र रेणुका सिंह यांच्याकडे सुपूर्द केली. आपणही सर्व पत्र थेट नरेंद्रजी मोदी यांच्या हातात देणार आहोत असे यावेळी रेणुका सिंह यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे , आमदार महेश दादा लांडगे, माजी आमदार योगेश टिळेकर , संघटन सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे, तालुकाध्यक्ष शांताराम भोसले, अतुल देशमुख, राजन परदेशी आदी उपस्थित होते.

भाजपाचे जिल्हा परिषदेमधील गटनेते शरद बुट्टे पाटील यांनी या लाभार्थी संवाद कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून खेड तालुक्यातील विमानतळ ,पुणे नाशिक रोड , पुणे नाशिक रेल्वे आदी प्रश्न सोडवण्याची रेणुका सिंह यांना विनंती केली.

पुणे जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष संजय रौंधळ, तालुका उपाध्यक्ष सुनील देवकर, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष काळुराम पिंजण, दत्तात्रय मांडेकर, शिवाजी डावरे आदिनी कार्यक्रमाचे नियोजन केले. रोहित डावरे यांनी सर्वांचे आभार मानले.

----------------------------★★★-----------------------------