Khed | राक्षेवाडी गावठाण ते वाघोबा मंदिरापर्यंत रस्ता करणार : आ. बाबाजी काळे

आमदारपदी निवड झाल्याबद्दल बाबाजी काळे यांचा राक्षेवाडी ग्रामस्थांकडून फेटा बांधून व शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार

Khed | राक्षेवाडी गावठाण ते वाघोबा मंदिरापर्यंत रस्ता करणार : आ. बाबाजी काळे

 Member of the Legislative Assembly (MLA) Babaji kale 

 

राजगुरूनगर | राक्षेवाडी गावठाण रस्त्यापासून ते ग्रामदैवत वाघोबा मंदिरापर्यंत नागरिकांना ये-जा करण्यासाठी संबंधित शेतजमीन मालकांनी रस्त्याला जागा द्यावी. शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कामाला संमती दिली तर आमदार फंडातून रस्त्याच्या कामाला लवकरच निधी टाकून रस्त्याचे काम मार्गी लावू असे आश्वासन आमदार बाबाजी काळे यांनी राक्षेवाडी ग्रामस्थांना दिले.


ग्रामदैवत वाघोबा महाराजांच्या भंडारा कार्यक्रमात राक्षेवाडी ग्रामस्थांनी आमदारपदी निवड झाल्याबद्दल बाबाजी काळे यांचा फेटा बांधून व शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बाजार समितीचे संचालक अशोक राक्षे,पंचायत समितीचे माजी उपसभापती सतीश राक्षे, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र राक्षे, नगरसेविका स्नेहल राक्षे, गावच्या सरपंच सविता राक्षे, उपसरपंच रविराज राक्षे,माजी सरपंच विद्या राक्षे, सुरेखा राक्षे, मच्छिन्द्रशेठ राक्षे, जितेंद्र सांडभोर, श्रद्धा सांडभोर, वैजयंता थिटे, चांगुणा थिटे, तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब सांडभोर, पोलीस पाटील पप्पूकाका राक्षे,अनिल राक्षे, बाबुराव राक्षे, हभप रामचंद्र राक्षे, हनुमंत राक्षे,पांडुरंग राक्षे, भीमाशंकर राक्षे, इंद्रजित राक्षे,अशोक वाळुंज, वैभव राक्षे,अक्षयआबा राक्षे,शंकर राक्षे आदी उपस्थित होते.


वाघोबा देवास सकाळी अभिषेक महापूजा,हारतुरे हा धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर मंदिरात दुपारी श्री हनुमान प्रासादिक भजनी मंडळ राक्षेवाडी यांचा भजनाचा कार्यक्रम झाला. भाविकभक्त ग्रामस्थांनी सकाळपासून ते रात्री पर्यंत दिवसभर मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली. सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.रात्री श्री पिरसाहेब प्रासादिक भजन मंडळ, मेंगडेवाडी, ता.आंबेगाव यांचा भजनाचा कार्यक्रम झाला.


देवाचा भंडारा कार्यक्रमाला डबल महाराष्ट्र केसरी पैलवान व पुणे मनपाचे क्रीडाधिकारी शिवराज राक्षे, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिलबाबा राक्षे, रोहिणी राक्षे आदींनी भेट दिली.