खेड तालुक्यातील सांडभोरवाडी - काळुस जिल्हा परिषद गटातून निवडणुकीसाठी अनेक दिग्गज इच्छुक

राजगुरूनगर सहकारी बँकेचे संचालक गणेश थिगळे यांचा वाढदिवस आमदार व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत धूमधडाक्यात साजरा

खेड तालुक्यातील सांडभोरवाडी - काळुस जिल्हा परिषद गटातून निवडणुकीसाठी अनेक दिग्गज इच्छुक

Pune zp election 

 

महावार्ता लाईव्ह | विधानसभा निवडणुका होऊन राज्यात महायुतीचे सरकार आले. तालुक्यातील सांडभोरवाडी - काळुस गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे हे खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्याने आमदार आहेत.  राज्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने आमदार काळे यांच्या गटात अनेक नवखे उमेदवारांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधनी करताना दिसत आहे. इच्छुकांच्या संख्येमध्ये विशेषता: माजी जिल्हा परिषद सदस्य व राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाउपाध्यक्ष अनिलबाबा राक्षे, राजगुरूनगर सहकारी बॅंकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक गणेश थिगळे, राजगुरूनगर शिवसेना उबा्ठा पक्षाचे  शहराध्यक्ष आमदार काळे यांचे निकटवर्तीय संतोष (पप्पूशेठ)राक्षे , राजगुरूनगर सहकारी बँकेच्या संचालिका अश्विनी पाचारणे, बाजार समितीचे माजी सभापती नवनाथ होले, अशोकदादा राक्षे, जयसिंग भोगाडे, पंचायत समितीच्या माजी सदस्या सुनीता सांडभोर असे अनेकजण इच्छुक आहेत.

 

सरकारकडून जिल्हा परिषद व पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. परंतु केवळ सुप्रीम कोर्टाकडून होणाऱ्या निर्णय प्रतिक्षेची इच्छुक उमेदवार वाट पाहत आहेत. निवडणूक जाहीर होईल तेव्हा होईल परंतु इच्छुक उमेदवारांनी आताच गुडघ्याला बाशिंग बांधून तयारीचे रणशिंग फुंकायला सुरुवात केली आहे.

 

सांडभोरवाडी-काळुस जिल्हा परिषद गट हा आमदार काळे यांचा बालेकिल्ला मनाला जातो. जिल्हा परिषद निवडणुकीत बाबाजी काळे व राष्ट्रवादीचे अरुण थिगळे यांच्यात सामना झाला होता. परंतु तगडे आव्हान देत काळे गटातून चांगल्या मतधिक्याने निवडून आले होते. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत देखील आमदार काळेंना भरघोस मताधिक्य याच गटातून मिळाले. यामुळे आमदार काळे यांच्या मनात जो उमेदवार असेल तोच निवडून येईल का ? परंतु याच जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीचे अनिल बाबा राक्षे हे अपक्ष निवडून आले होते. दुसऱ्या पंचवार्षिक मध्ये राष्ट्रवादी पक्षच्या तिकिटावर राक्षे यांच्या पत्नी रोहिणी राक्षे निवडून आल्या होत्या. २०१७ जिपच्या निवडणूकित अनिलबाबा उमेदवार नव्हते. परंतु सध्याच्या पंचवार्षिकमध्ये राक्षे तीव्र इच्छुक असून त्यांची ताकद या जिल्हा परिषद गटात चांगली आहे. आता या जिल्हा परिषद गटाला नवखा की अनुभवी जिल्हा परिषद सदस्य मिळणार अशी जोरदार चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.

 

राजगुरूनगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष विद्यमान संचालक गणेश थिगळे यांनी आपला वाढदिवस मोठ्या धूमधडक्यात साजरा केला. वाढदिवसाच्या कार्यक्रमाला अनेक मान्यवर नेते व कार्यकर्त्यांची उपस्थिती मोठी होती. थिगळे यांनी तालुक्यातील असणारा मित्र परिवार व प्रामुख्याने सांडभोरवाडी - काळुस जिल्हा परिषद गटातील मिञ परिवारासह पाहुणे यांना निमंत्रण देत वाढदिवस चर्चेत राहील असा साजरा करत जोरदार शक्ती प्रदर्शन केले. 

 

थिगळे यांच्या वाढदिवस कार्यक्रमाला खेडचे आमदार बाबाजी काळे, भोसरीचे आमदार महेश लांडगे, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांसह तालुक्यातील दिग्गज नेते अनेक गावचे आजी माजी सरपंच, वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी, पैलवान यांसह अनेक कार्यकर्ते शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.