Sahakar Award | सतीश चांभारे यांना ‘सहकार प्रशासकीय सेवा पुरस्कार’; सहकार क्षेत्रातील कार्याचा गौरव
स्व. सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठानच्या वतीने चाकण येथे पुरस्कार प्रदान; नीलम गोऱ्हे, शिवाजीराव आढळराव पाटील यांची उपस्थिती
महावार्ता लाईव्ह | सहकार क्षेत्रातील अनेक संस्थांमध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सेवानिवृत्त सचिव व खेड तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक सतीश चांभारे (सुपेकर) यांना "सहकार प्रशासकीय सेवा पुरस्कार" प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
खेड तालुक्याचे माजी आमदार स्व.सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा "सहकार प्रशासकीय सेवा पुरस्कार" सतीश चांभारे यांना चाकण येथे विधान परिषदेच्या माजी उपसभापती निलम गोऱ्हे, पुणे म्हाडाचे अध्यक्ष व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील,आमदार बाबाजी काळे,चाकण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा मनीषा गोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
चांभारे यांनी १९९० ते २०१९ या प्रदीर्घ कालावधीत खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव म्हणून पदभार यशस्वीपणे संभाळला.२०११ मध्ये राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे हस्ते देखील चांभारे यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार झाला होता.सहकार क्षेत्रातील संस्थांमध्ये केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन प्रतिष्ठानने त्यांना "सहकार प्रशासकीय सेवा पुरस्कार" दिला आहे.
यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण समितीचे सदस्य नितीन गोरे, पंचायत समितीच्या सभापती गौरी मुऱ्हे, बाजार समितीचे सभापती अशोकदादा राक्षे, माजी सभापती व जिल्हा परिषदेचे गटनेते विजयसिंह शिंदे पाटील, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका ज्योती आरगडे, शिवसेना नेते प्रकाश वाडेकर, बाजार समितीचे संचालक माणिक गोरे, केशव आरगडे, ॲड.पोपटराव तांबे यांसह तालुक्यातील विविध मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्याबद्दल चांभारे यांचे खेड तालुक्यातील अनेक संस्थांचे पदाधिकारी व मित्र परिवाराकडून अभिनंदन होत आहे.