Khed | राजगुरूनगर हदरले ५ वर्षाच्या बालकावर अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना
प्रांतविधी होणाऱ्या जागेवर अनैसर्गिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

राजगुरुनगर : पाच वर्षांच्या बालकावर २४ वर्षीय नराधमाने अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना राजगुरुनगर येथे घडली. याप्रकरणी आरोपी विजय बाळु ताठोड उर्फ गोल्या (वय -२४) रा. माळीमळा राजगुरूनगर ता. खेड जि. पुणे यांच्यावर खेड पोलीस ठाण्यात बाल लैंगिक आत्याचार अधिनियम २०१२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी माहिती दिल्यानुसार दि २२ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास राजगुरूनगर गावच्या हद्दीत आरोपी विजय बाळु ताठोड उर्फ गोल्या याच्या राहत्या घरासमोर फिर्यादी यांचा मुलगा खेळत असताना तुला खावु देतो असे आमिष दाखवून त्याच्या घरात नेवुन त्याने मुलावर जबरी आत्याचार कृत्य केल्याची घटना घडली. याप्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक स्नेहल गुरव करत आहे.