khed | पल्लवी वाडेकर - पऱ्हाड यांची राज्यसेवा परीक्षेत उपशिक्षण अधिकारी पदी निवड
अमितकुमार टाकळकर
राजगुरूनगर :येथील पल्लवी वाडेकर-पऱ्हाड यांची नुकतीच उपशिक्षण अधिकारी (वर्ग २) पदावर राज्य सेवा परीक्षेतून निवड झाली आहे.
पल्लवी वाडेकर-पऱ्हाड उद्योग अधिकारी म्हणून मुंबई येथे कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी वन अधिकारी म्हणून सेवा दिली आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर वाडेकर हे सेवानिवृत्त उपअभियंता तर आई डॉ. मंगल वाडेकर या वैद्यकीय सेवेत आहे. त्यांचे पती राहुल हे भूवैज्ञानिक म्हूणन केंद्रीय सेवेत आहेत.
