राजगुरुनगरला सिद्धेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी

महाशिवरात्री निमित्ताने मंदिराला आकर्षक विद्युतरोषणाई,फुलांची सजावट करण्यात आली

राजगुरुनगरला सिद्धेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी

सिद्धेश्वर मंदिरात दर्शन घेताना भाविक

Devotees crowd at Siddheshwar temple in Rajgurunagar

 

राजगुरुनगर : महाशिवरात्री निमित्त राजगुरुनगर येथील प्रसिद्ध सिद्धेश्वर मंदिरातील शिवलिंगाचे दर्शन घेताना 'हर हर महादेव' जय भोलेनाथ असा जयघोष करीत हजारों भाविकांनी दर्शन घेतले.
 

राजगुरुनगर येथील भीमानदी तीरावर गर्द झाडीच्या परिसरात श्री क्षेत्र सिद्धेश्वराचे पुरातकालीन मंदिर असून मंदिरात शिवलिंग आहे.दर्शनासाठी राजगुरुनगर शहरासह परिसरातील २४ वाड्यावसत्यांचे व अनेक गावातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.महाशिवरात्री निमित्ताने मंदिराला आकर्षक विद्युतरोषणाई,फुलांची सजावट करण्यात आली होती. मंदिराच्या सभामंडपात दिवसभर भजन सुरू होते.यामुळे संपूर्ण परिसर भक्तीमय झाला.परिसरात बेलफुल,खेळणी,चहा,प्रसाद आदींची अनेक दुकाने थाटली होती.प्रसादासाठी चिक्की,केळी दूध तसचे खिचडीचे वाटप करण्यात आले. मंदिर परिसरातील कृत्रिम धबधबा भाविकांना पाहण्यासाठी आकर्षक होता.

 

सिद्धेश्वराचे दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली होती.परंतु आलेल्या सर्व भाविकांनी दर्शनबारीने भोलेनाथ शिवलिंगाचे दर्शन घेतले.राजगुरुनगर पोलिस स्टेशनचा चोख बंदोबस्त होता.श्री सिद्धेश्वर परिसर सेवेकरी मंडळ व ट्रस्टकडून भाविकांचे स्वागत करण्यात आले.