Khed | गद्दारांना त्यांची जागा दाखवण्याचे काम महाराष्ट्र करणार - जयंत पाटील
लोकसभेनंतर होणाऱ्या विधानसभेला खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला द्यावा - मा. उपसभापती अमोल पवार

राजगुरुनगर | राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह तुतारी वाजवणारा माणुस महाराष्ट्राच्या घराघरात पोहचला आहे.महाविकास आघाडीच्या पक्षांमध्ये समन्वयक आहे.लोकसभा निवडणूक झाल्यावर विधानसभेची सत्ता आमच्याकडे राहिल व महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल.लोकसभा निवडणूक लोकांनी हाती घेतली आहे.मराठी माणसाला गद्दारीचा राग येतो.गद्दारांना त्यांची जागा दाखवण्याचे काम महाराष्ट्र करणार आहे.अशी टीका राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
राजगुरूनगर जवळच्या चांडोली टोलनाका येथे शिवसेनेचे जनसंपर्क कार्यालय व खासदार अमोल कोल्हे यांच्या निवडणूक कचेरीचे उदघाटन जयंत पाटील व उबाठा शिवसेनेचे संपर्काप्रमुख सचिन अहिर यांचे हस्ते झाले.यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.शिवसेनेचे अमोल पवार यांनी हे कार्यालय उभारले आहे.यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे,शिरूरचे आमदार प्रकाश पवार, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्रकाश म्हस्के,उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड,सुरेश भोर,माजी उपसभापती अमोल पवार,माजी जिप सदस्य अतुल देशमुख,बाबाजी काळे, तनुजा घनवट,शैलेश मोहिते,संजय घनवट,सुधीर मुंगसे,बाजार समितीचे संचालक सोमनाथ मुंगसे,सागर मुऱ्हे,रामदास धनवते, शिवाजी वर्पे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सचिन अहिर म्हणाले पंतप्रधान मोदी प्रचारासाठी येऊन असली व नकली शिवसेना असा मुद्दा उपस्थित करून वाद निर्माण करतात हे योग्य नाही.शिवसैनिक ताकतीने निवडणुकीत उतरले असून शिरूर व मावळ दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास व्यक्त करून महायुती सरकारवर घणाघाती टीका केली.
अमोल पवार म्हणाले महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांचा विजय निश्र्चित आहे. खेडमधून कमीतकमी ७० हजाराचे लीड दिले जाईल. लोकसभेनंतर होणाऱ्या विधानसभेला खेड आळंदी हा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला द्यावा अशी मागणी केली.
यावेळी खांडेभराड,हिरामण सातकर,रामदास धनवते यांची भाषणे झाली.सूत्रसंचालन शिवाजी वर्पे यांनी केले.आभार जाकीर अन्सारी यांनी मानले.