Khed | राजगुरूनगरच्या वाडारोड रस्त्यालगत कापड दुकानांसमोर बेशिस्त पार्किंग

बेशिस्त पार्किंगमुळे सर्वसामान्य नागरिक जीव मुठीत धरून करतात प्रवास | अपघाताचा धोका वाढला

Khed | राजगुरूनगरच्या वाडारोड रस्त्यालगत कापड दुकानांसमोर बेशिस्त पार्किंग

राजगुरूनगर : शहरातील मुख्यारस्त्यवरील पार्किंग केलेल्या बेशिस्त वाहनांमुळे नागरिकांना ट्रॅफिक सामना करावा लागत आहे. सध्या दिवाळी निमीत्ताने तालुक्यातील नागरिक राजगुरुनगर खरेदीसाठी येत आहे. शहरातील मुख्यरस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे.पूर्वी रस्ता रुंद होता आता काम झाल्याने रस्ता मोठा झाला आहे. तरीसुद्धा कापड व्यवसायिकांच्या दुकानासमोर लावलेल्या बेशिस्त वाहनांच्या पार्किंग मुळे नागरिकांना प्रचंड नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

 

शहरातील वाडारोड कपड्याचे दुकानासमोर पार्किंग केलेल्या वाहनांमुळे पदाचारी नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून अपघाताचा ही मोठा धोका आहे.याच दुकानापुढे मागच्या वर्षी चिमुकल्या मुलाचा ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडून मृत्यू झाला ही घटना ताजी असताना वाडा रोड येथे असलेल्या कपड्यांच्या दुकानासमोर होणाऱ्या पार्किंगमुळे पादचारी नागरिकांच्या जीवाला धोका होऊ शकतो.एकतर कोणत्याही कापड दुकानदारांनी पार्किंगची व्यवस्था केली नाही.त्यामुळे दुकानांपुढे होणाऱ्या बेशिस्त पार्किंग सुरळीत करण्यासाठी पोलीस व राजगुरुनगर नगरपरिषद कारवाई करणार का ? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

 

 

शिरूर - भिमाशंकर महामार्ग असल्याने या रस्त्यावर कायम वाहतुकीची वर्दळ असते.शहरातील रस्त्यालगत छोटे - मोठे व्यवसायिकांचे दुकाने आहेत. त्यांच्या दुकानात जेव्हा ग्राहक येत असतात तेव्हा पार्किंगसाठी जागा उपलब्ध नसते आणि असेल तिथे म्हणजे भर रस्त्यात दुकांनासमोरच गाडी पार्किंग केली जाते. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना दुकानांसमोर पार्किंग केलेल्या वाहनांचा नाहक त्रास सहन करावा लागतो.दुकानांसमोर या बेशिस्त पार्किंग केलेल्या वाहनांवर तसेच दुकानांवर राजगुरुनगर नगरपरिषद कारवाई करणार का ? असे राजगुरूनगर शहरातील नागरिकांकडून सवाल उपस्थित केला असून दुकानासमोर होणारी वाहतूक कोंडी पोलीस व नगरपरिषदेने सोडवावी अशी मागणी नागरिकांची आहे.

 

​​​​​​