Khed | विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी शाळांची सद्यस्थिती सुधारण्याची नितांत गरज
रेटवडी- वाफगाव जिल्हा परिषद गटातील लकी ड्रॉ पद्धतीने विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप व हेलिकॉप्टर राईड संधी
महावार्ता लाईव्ह | जिल्हा परीषद शाळेतील विद्यार्थ्यांची विद्याथ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी शाळांची सद्यस्थिती सुधारण्याची नितांत गरज आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आजही शाळेसाठी पायी प्रवास करावा लागतो.त्यासाठी वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.जिल्हा परिषद सदस्य महणून निवडून आल्यास आवश्यक सुविधा निर्माण करणार असल्याची स्पष्ट ग्वाही रेटवडी - वाफगाव जिल्हा परिषद गटातील उमेदवार दीप्ती भोगाडे यांनी दिली.
रेटवडी-वाफगाव जिल्हा परिषद गटाच्या इच्छुक उमेदवार दीप्ती प्रसाद भोगाडे यांच्या माध्यमातून राजगुरूनगर येथील खांडगे लॉन्स कार्यालयात प्रसिद्ध व्याख्याते प्रा.वसंत हंकारे यांचे प्रेरणादायी व्याख्यान झाले.गटातील प्रत्येक गावातील एका विद्याथ्यर्थ्यांसाठी हेलिकॉप्टर सफर देण्यात येणार असून लकी ड्रॉ विजेत्या ठरलेल्या प्रत्येक गावातील तीन विद्यार्थ्यांना सायकल वाटप अशा अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमात आमदार बाबाजी काळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रा.वसंत हंकारे,खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयसिंग भोगाडे, माजी सभापती दशरथ गाडे, माऊली ढेरंगे, दिलीप डुबे, मारुती सातकर, उद्योजक प्रसाद भोगाडे यांच्यासह विविध गावांतील पालक,शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा परीषद शाळेत सर्व सुविधा निर्माण करण्यासाठी आणि गावांचा विकास साधण्यासाठी सक्षम आणि संवेदनशील प्रतिनिधी निवडून आला तर परिसराचा खऱ्या अथनि विकास होतो.परिसराचा विकास आणि समाजाची सेवा करण्याच्या दृष्टीने मी जिल्हा परीषद निवडणूक लढवत आहे.आपले सर्वांचे आशीर्वाद महत्वाचे आहेत असे आवाहन दीप्ती भोगाडे यांनी केले.
प्रसिद्ध व्याख्याते प्रा. वसंत हंकारे यांनी विद्यार्थ्यांना जिद्द,सातत्य,मेहनत, आणि ध्येय निश्चित करावे असा महत्वपूर्ण सल्ला देत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. सायकल वाटपचा उपस्थित मान्यवरांचे हस्ते काढण्यात आला.निवड झालेल्या विद्याथ्यांना सायकलचे वाटप करण्यात आले, तर हेलिकॉप्टर सफरीच्या घोषणेमुळे विद्याध्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदेश टोपे व सुदाम कराळे यांनी केले,तर आभार जयसिंग भोगाडे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी रेटवडी-वाफगाव जिल्हा परिषद गटातील विविध गावांमधून विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
