शिवजयंती निमित्ताने विकास चव्हाण मित्र मंडळ व योगेश्वर ग्रुप पाबळरोड यांच्या वतीने महिलांना वृक्षारोपांचे वाटप
राजगुरूनगर : प्रतिनिधी
स्वराज्य स्थापन करण्याच्या विचारांशी सहमत असणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी स्वराज्याची निर्मिती केली.छत्रपती शिवाजी महाराज यांचे महान कार्य आणि दूरदृष्टी विचार समाजासाठी प्रेरणादायी आहेत.असे मत आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी व्यक्त केले.
विकासभाऊ चव्हाण मित्र मंडळ व योगेश्वर ग्रुप पाबळरोड यांच्या वतीने आयोजित शिवजयंती उत्सव कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषद सदस्य शांताराम (बाप्पू) चव्हाण,पंचायत समितीचे माजी उपसभापती सतीशशेठ राक्षे,राक्षेवाडीचे माजी उपसरपंच नामदेव चव्हाण,गुडलकचे उद्योजक दिनेशशेठ सांडभोर पाटील,दिलीपराव सुतार,विकासभाऊ चव्हाण,बाप्पूशेठ सांडभोर, हेमंत चव्हाण, बाळूनाना चव्हाण,संजय टाकळकर,जगदीश खंडिझोड, सुरेश सांडभोर,दिलीप होले, कृष्णा पाटील आदी उपस्थित होते.शिवनेरी किल्ल्यावरून सकाळी शिवज्योत आणण्यात आली.लहान मुलांनी शिवाजी महाराज यांचे पोवाडे,गीत सादर केले.रात्री शिवाजी महाराजांची आरती झाल्यानंतर उपस्थित सर्व महिलांना वृक्षारोपांचे वाटप केले.

शिवजयंती यशस्वी करण्यासाठी रोहित बोंबले,मोहीन शेख,रोशन बोंबले,अक्षय धनवे,संग्राम पवार,अतुल भालेराव,किरण शेलार,तेजस शेलार,अमोल जाधवर,गणेश बोंबले, समीर चौधरी,समाधान मांजरे,गौरव कांबळे,विनायक गायकवाड,प्रशांत गोपाळे, सोन्या खंडीजोड,अभि गोसावी,पप्पू शिंदे,बंटी मांजरे, नितिन आडवळे,गणेश लोंढे,अनिकेत भोसले,अभिषेक शिंदे,संदीप पडघमकर, स्वप्निल पवार, व विकास चव्हाण मित्र मंडळाचे कार्यकर्त्यानी प्रयत्न केले.
माजी उपसभापती सतीश राक्षे यांनी विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार अतुल भालेराव यांनी मानले.
----------------------------------------------------------------------
