प्रसिद्ध हॉटेल उद्योजक आकाश थिगळे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
वाढदिवसानिमित्ताने खेड तालुक्यातील आजी - माजी पदाधिकारी तसेच तालुक्यातील सरपंच ,बैलगाडा मालक यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आल्या
राजगुरूनगर : शहरातील प्रतिथयश उद्योजक कु.आकाश नामदेव थिगळे यांचा वाढदिवस राजगुरूनगर येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. वाढदिवसदिनी आकाश यांचे समवेत अनेक समर्थकांनी केक कापून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
"आकाश थिगळे या कर्तृत्ववान सुपुत्राने व्यवसाय क्षेत्रात आपल्या नावाचा वेगळा ठसा निर्माण करून 'आकाश मिसळ हाऊस' हे नाव पुणे जिल्ह्यात त्यांनी प्रसिद्ध केले.महाराष्ट्रातील चोखदंळ ग्राहकांच्या सेवेत उतरून 'जिभेला रुचेल आणि पोटाला सोसेल' अशा पद्धतीने अनेक पदार्थ ग्राहकांना खाण्यासाठी देत यामुळेच आकाश मिसळ हाऊस हे नाव महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे.
त्यांच्या व्यवसायाच्या यशाचा वेलू दिवसेदिवस असाच गगनभरारी घेवो.अशा भावना आकाश थिगळे यांच्या वाढदिवसदिनी बाजार समितीचे माजी उपसभापती व विद्यमान संचालक अशोकदादा राक्षे यांनी व्यक्त केल्या.
उद्योजक आकाश थिगळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक व जिपचे माजी सभापती अरुण चांभारे,बाजार समिती संचालक जयसिंग भोगाडे,शिवसेनेचे नेते बाळासाहेब मांजरे,निवृत्त पोलीस अधिकारी बाळासाहेब थिगळे, प्रसिद्ध गाडामालक व हॉटेल व्यावसायिक नामदेवराव थिगळे आणि आकाश ग्रुपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.मांजरेवाडी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य व शिवसेनेचे नेते बाळासाहेब मांजरे यांनी देखील आकाश थिगळे यांचे तोंडभरून कौतुक करून भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
