चाकणमध्ये अक्षय जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दहीहंडी; अभिनेत्री आणि लावणीचा रंगणार थरार

अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर, महिमा म्हात्रे आणि सोनाली पाटील यांची दहीहंडी उत्सवाला उपस्थिती

चाकणमध्ये अक्षय जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दहीहंडी; अभिनेत्री आणि लावणीचा रंगणार थरार

 

महावार्ता लाईव्ह | अश्वमेध फाउंडेशनचे सर्वेसर्वा, पुणे जिल्हा शिवसेना उपजिल्हाप्रमुख आणि युवा उद्योजक अक्षय जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चाकण येथे भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा थरारक आणि दिमाखदार उत्सव आज,(दि.५) सायंकाळी ठीक ७:०० वाजता संपन्न होणार आहे.

 

चाकण येथील ग्रँड सेंट्रल इमारतीशेजारी, विशाल कॅपिटल समोर या उत्सवाचा भव्य आखाडा सज्ज झाला आहे. परिसरातील तसेच पुणे जिल्ह्यातील नामांकित गोविंदा पथके थर रचून सलामी देण्यासाठी या ठिकाणी दाखल होणार असून, या उत्सवामुळे चाकण परिसरामध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

जाहिरात 

 

सिनेतारकांची मांदियाळी या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर, महिमा म्हात्रे, सोनाली पाटील या दिग्गज अभिनेत्री या दहीहंडी उत्सवाला विशेष उपस्थिती लावून गोविंदा पथकांचा उत्साह वाढवणार आहेत.

 

गौतमी (गऊ) खुडे यांच्या लावणीचा धमाका दहीहंडीच्या थरारासोबतच रसिकांसाठी खास सांस्कृतिक मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राची प्रसिद्ध लावणी नृत्यांगना गऊ खुडे या देखील या कार्यक्रमात उपस्थित राहणार असून, त्यांच्या बहारदार लावणी नृत्याची रंगत प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

 

या भव्य दहीहंडी उत्सवाची जय्यत तयारी आयोजकांकडून पूर्ण झाली असून, नागरिकांसाठी उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. चाकण व पंचक्रोशीतील नागरिक, क्रीडाप्रेमी आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजन समिती व अश्वमेध फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.