Zp election | काळुस पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीचे उमेदवार सय्यदभाई इनामदार यांचा विजय निश्चित
सर्वसामान्य जनतेच्या पाठिंब्याने सय्यदभाई इनामदार यांचा मोठा विजय नक्की...
महावार्ता लाईव्ह | काळुस पंचायत समिती गणातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सय्यदभाई इनामदार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट वराळे येथे झालेल्या जाहीर कार्यक्रमात घेतल्यानंतर काळूस मतदारसंघातील विकासकामांना निधी देण्याची मागणी केली होती.अजितदादांनी देखील निधी देण्यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला होता.
काळुस पंचायत समिती गणातून उमेदवार सय्यद भाई इनामदार यांना मतदार संघातील नागरिक व मतदार यांच्याकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असून त्यांची विजयाकडे वाटचाल सुरू आहे.सर्वसामान्य नागरिक यांचा वाढता पाठिंबा पाहता इनामदार हे काळूस मतदारसंघातून मोठ्या फरकाने निवडून येणार असल्याचा आशीर्वाद अनेक गावातील प्रमुख कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.तसेच इनामदार यांचा नागरिकांशी होत असलेला संवाद विकासाच्या दृष्टीने सकारात्मक असून यामुळे त्यांचे निवडणुकीतील पारडे दिवसेंदिवस जड होत चालले आहे.
विरोधी पक्षाच्या उमेदवारांना पराभव स्पष्ट दिसू लागल्याने त्यांनी खालच्या पातळीवर येऊन अनेक आरोप प्रत्यारोप व जातीपातीचे राजकारण सुरू केले आहे. परंतु याचा इनामदार यांच्यावर काहीही परिणाम होणार नाही. मतदारसंघातील सर्वसामान्य जनता व मतदारराजा इनामदार यांच्या ठामपणे पाठीशी आहेत. याच जोरावर इनामदार निवडणुकीत मोठ्या फरकाने निवडून येणार असल्याचा आशावाद नागरिकांकडून व्यक्त होत आहे.सय्यदभाई यांनी सर्वसामान्य लोकांना शासनाच्या अनेक वैयक्तिक लाभाच्या योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून काळुस गणातील प्रत्येक गाव व वाडीवस्तीवर विकासकामे करणार असल्याची त्यांची भूमिका राहणार आहे.
एकंदरीत जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक ऐन टप्प्यात आली असून काही दिवसांवर मतदान होणार आहे.इनामदार यांना मतदार संघातील जनतेकडून वाढत असलेला पाठिंबा पाहता त्यांचा विजय एकतर्फी असल्याचे अनेक गावातील कार्यकर्ते स्पष्टपणे बोलून दाखवीत आहेत.यामुळे काळुस पंचायत समिती मतदार संघातून इनामदार यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
