खरपुडीतील पाच जणांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडले. छाप्यात ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जागेवर जप्त.खेड डीबी पोलिसांची कामगिरी.

खरपुडीतील पाच जणांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडले. छाप्यात ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जागेवर जप्त.खेड डीबी पोलिसांची कामगिरी.

राजगुरुनगर - प्रतिनिधी

            खेड तालुक्यातील खरपुडी खुर्द येथे पोलिसांनी छापा टाकून पत्यांचा जुगार खेळणाऱ्या पाच जणांना राजगुरूनगर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाच्या पोलिसांनी पकडले.त्यांच्याकडून ४७ हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त केला असून त्यांना अटक करण्यात आली.
     राजगुरूनगर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले व पोलीस अंमलदार संतोष घोलप यांना गोपनीय खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार खरपुडी खुर्द गावचे हद्दीच्या खिंडी जवळच्या पोल्ट्रीमध्ये काही लोक पैशावर जुगार खेळत आहेत.या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस पथकाने छापा टाकला असता नामदेव दाजी गाडे (वय५३),  सत्यवान काळूराम गाडे (वय ४५),शरद तुकाराम गाडे (वय ४३),रूपेश पाराजी खंडागळे (वय ३०),अजित शंकर गाडे (वय ४५) सर्व राहणार खरपुडी खुर्द यांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडले.
      जुगाराचे साहीत्य,रोख रक्कम व इतर वस्तू असा एकुण ४७ हजारांचा मुद्देमाल केला.पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.याबाबत पोलीस हवालदार निखिल गिरिगोसावी यांनी राजगुरूनगर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

राजगुरूनगर पोलीस स्टेशन मधील गुन्हे शोध पथकाने अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे काम आणि अवैध धंदे विरुद्ध जोरात मोहीम सुरू केल्याने अनेक गुन्हेगारांना पळता भुई थोडी झाली.पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले यांच्या डॅशिंग भूमिकेमुळे खेडच्या अनेकांनी गुन्हे शोध पथकाचा (डीबी) धसका घेतला आहे.

----------------------------------------