कुरकुंडी येथे मुकाई देवीची महायात्रा आजपासून सुरू ; बैलगाडा शर्यतीचे आयोजन

श्री मुकाई देवीच्या महायात्रे निमित्त अनेक कार्यक्रमाचे आयोजन ; यात्रा थाटात संपन्न होणार - सरपंच गणेश काळे

कुरकुंडी येथे मुकाई देवीची महायात्रा आजपासून सुरू ; बैलगाडा शर्यतीचे आयोजन


राजगुरुनगर :  कुरकुंडी (ता.खेड) येथील पुणे जिल्ह्यात नावाजलेली श्री मुकाई देवीची महायात्रा (दि.१२ ते १५ मार्च) दरम्यान आयोजित केली आहे.महायात्रा निमित्त चार दिवस बैलगाडयांच्या शर्यती असून तीन दिवस करमणूकीसाठी लोकनाट्य,लावणी महोत्सव,भजनी भारूड कार्यक्रम आहेत.बैलगाडा शर्यतीसाठी एकूण इनाम ४ लाख ३२ हजार ६६६ रुपये तसेच ६ दुचाकी,दोन कुट्टी मशीन,दोन फिल्टर,दोन एलसीडी,दोन चार्जिंग पंप आणि सोलरलाईट,ट्रॉफी, चषक अशी अनेक भव्य बक्षिसे आहेत.तसेच सलग तीन वर्ष 2023 ते 2025 मध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या गाडा मालकांला बोलेरो गाडी बक्षीस मिळणार आहे.अशा भरगच्च कार्यक्रमांनी श्री मुकाई देवीची महायात्रा आयोजित केल्याची माहिती कुरकुंडी गावचे सरपंच गणेश काळे यांनी दिली.

श्री मुकाई देवी यात्रेनिमित्त पहाटे देवीस अभिषेक,महापूजा, हारतुरे,मांडव डहाळे आणि रात्री पालखी मिरवणूक असे धार्मिक होणार आहेत.मंगळवार (दि.१२) यात्रेच्या पहिल्या दिवशी  बैलगाडयांच्या शर्यती झाल्यावर नागरिकांच्या करमणूकसाठी रात्री साईनाथ कला नाट्य मंडळ,चांदुस यांचा भजनी भारुडाचा कार्यक्रम होणार आहे.त्यानंतर (दि.१३) दुसऱ्या दिवशी बैलगाडा शर्यती झाल्यावर रात्री करमणूकीसाठी महाराष्ट्रात गाजत असलेल्या लावणी सम्रानी हिंदवी पाटील यांचा लावणी महोत्सव कार्यक्रम होणार आहे.

गुरुवार (दि.१४)रोजी फक्त सकाळ पासून सायंकाळ पर्यंत बैलगाडा शर्यती आहेत.चौथ्या दिवशी शुक्रवार (दि.१५) बैलगाडा शर्यती झाल्यावर रात्री १० वाजता महाराष्ट्रात गाजलेला मंगला बनसोडे सह नितीनकुमार करवंडीकर यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम होणार असून दुसऱ्या दिवशी हजेरीचा कार्यक्रम आहे.असे भरगच्च कार्यक्रम महायात्रेत होणार आहेत.

बैलगाडा शर्यत  प्रथम क्रमांकासाठी १,२५,५५५ रुपये, दुसऱ्या क्रमांकाला १,११,१११ रुपये, तृतीय क्रमांकाला ७५,०००  हजार रुपये तर चतुर्थ क्रमांकास ५१,००० हजार रुपये अशी बक्षिसे आहेत.तर घाटात फळीफोड करणाऱ्या बैलगाडयांस १ नंबरला - २५  हजार रुपये,दोन नंबरला - २० हजार रुपये, तीन नंबरला - १५  हजार रुपये तर चार नंबरला १० हजार अशी रोख बक्षिसे ठेवली आहेत.तसेच विशेष फायनल बैलगाडा शर्यतीसाठी पहिल्या दिवशी चार दुचाकी,दुसऱ्या दिवशी दोन दुचाकी,दोन कुट्टी मशीन, दोन फिल्टर,दोन एलसीडी, दोन चार्जिंग पंप सोलर लाईट अशी वस्तुरूपी बक्षिसे आहेत.महायात्रेसाठी तालुक्यातील अनेक नेत्यांना निमंत्रित केले आहे.