हुतात्मा राजगुरू स्मृतिशिल्प स्थळ येथे ध्वजारोहण
राजगुरूनगर : राजगुरूनगर येथील पुणे नाशिक महामार्गावरील हुतात्मा शिवराम हरी राजगुरू,भगतशिंग,सुखदेव यांचे स्मृतीशिल्प परिसरात व राक्षेवाडी ग्रामपंचायत येथे ध्वजारोहण होऊन विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले.
हुतात्मा राजगुरू,भगतसिंग,सुखदेव यांच्या स्मृतीशिल्प परिसरातील धवजस्तंभाचे पूजन अनेक मान्यवरांनी केल्यानंतर ध्वजारोहण बाजार समिती समितीचे माजी उपसभापती व संचालक अशोकदादा राक्षे यांचे हस्ते झाले. राक्षेवाडी ग्रामपंचायत कार्यालय व प्राथमिक शाळेत ध्वजारोहण सरपंच सुरेखा राक्षे यांचे हस्ते संपन्न झाले. शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांचे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होऊन नवोदय विद्यालयात गेलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार झाला.
यावेळी बाजार समितीचे माजी सभापती शांताराम चव्हाण,माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र राक्षे,माजी उपसभापती सतीश राक्षे, उपसरपंच मच्छिंद्र राक्षे,पोलीसपाटील पप्पूकाका राक्षे, ग्रामपंचायत सदस्य रविराज राक्षे, जितेंद्र सांडभोर,श्रद्धा सांडभोर,सविता राक्षे,वैजयंता थिटे,चांगुणाबाई थिटे, ग्रामविकास अधिकारी तुषार साळुंखे,शाळेचे शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
