ढुम्या डोंगरावर लोकवर्गणीतून कामे
ढुम्या डोंगर गिरिभ्रमण मॉर्निंग वॉक ग्रुपने डोंगरावरील मारुती मंदिर परिसरात लोकवर्गणीतून कामे केली आहेत.
राजगुरूनगर : ढुम्या डोंगर गिरिभ्रमण मॉर्निंग वॉक ग्रुपने डोंगरावरील मारुती मंदिर परिसरात लोकवर्गणीतून झाडांना ओट्यांचे बांधकाम,पाणी साठवण टाकी,मंदिर परिसरात फरशीचे काम,ओपन जिम साहित्य बसविले अशी कामे केली आहेत.
राजगुरूनगर जवळच्या चांडोली,वडगाव पाटोळे व शिरोली या तीन गावच्या हद्द सीमेवर ढुम्या डोंगर आहे.गर्द झाडी असलेल्या डोंगराचे पायथ्यापासून चासकमान धरणाचा उजवा कालवा गेला असून डोंगराचे काही क्षेत्र वनविभागाचे तर काही क्षेत्र खाजगी मालकीचे आहे. डोंगराचे उंच माथ्यावर २५ वर्षपुर्वी मॉर्निंगवॉक ग्रुपने लोकवर्गणीतून मारुती मंदिराची उभारणी केली.मागील काही वर्षापुर्वी सातत्याने मॉर्निंगवॉक करीता येणाऱ्या नागरिकांचा ढुम्या मारुती गिरिभ्रमण ग्रुप तयार झालाय. डोंगर परिसरात ग्रुपकडून अनेक प्रकारची झाडे लावली जात असून झाडांना पाणी देण्यासाठी छोटीशी पाणी योजना करून झाडांना नित्यनियमाने पाणी देऊन त्यांचे संवर्धन करण्याचे काम होत आहे.डोंगराचे झाडी परिसरात मोरांचे थवे असून त्यांना दररोज खाण्यासाठी धान्य टाकले जात असून पाण्याची देखील सोय केली आहे.
पहाटे डोंगराचे परिसरातून फिरून आल्यावर मंदिर समोरील परिसर जागेत दररोज सर्वांना योगगुरू रामचंद्र घोलप व प्रदीप सारडा हे योगाचे धडे देतात.लोकवर्गणीतून वरील कामे करण्यासाठी नामदेव चव्हाण,सुधाकर जाधव, सुरेश कातळे,मारती घुमटकर,अँड पांडुरंग राऊत,जयंत घोरपडे,दिलीप करंडे,अरविंद आरोलीकर,अँड तळेकर, शंकर बोंबले,सोपान राक्षे आदींनी प्रयत्न केले.
