माणुसकी जपणार गाव म्हणून राजगुरूनगरची ओळख - अर्चना सैद-कदम
माऊली सेवा प्रतिष्ठान सामाजिक संस्थेच्या प्रथम वर्धपनदिन संपन्न
राजगुरुनगर
राजगुरूनगर शहरातील अनेक सामाजिक संघटना यांचे सामाजिक कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे.राजगुरूनगर शहर म्हणजे माणुसकी जपणारे गाव अशी ओळख सगळीकडे होत आहे.असे प्रतिपादन व्याख्यात्या अर्चना सैद-कदम यांनी केले.
राजगुरूनगर येथील माऊली सेवा प्रतिष्ठान सामाजिक संस्थेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्याख्यात्या अर्चना सैद-कदम यांनी "जगणं समाजासाठी" या विषयावर व्याख्यान केले. राजगुरुनगर येथील खेड पंचायत समिती कार्यालयात शिवछत्रपती सभागृहात पार पडला.माऊली सेवा प्रतिष्ठान यांच्याकडून जुने परंतु चांगले कपडे गोळा करून गरजूना मोफत वाटप केले जातात याकार्याबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल गुरव यांनी कौतुक केले. तर डॉ. दिलीप बांबळे यांनी रुग्णांच्या बाबतीत प्रतिष्ठानला कायम सहकार्य राहील अशी भावना व्यक्त केली.
यावेळी खेड पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल गुरव, डॉ.दिलीप बांबळे, डॉ.योगेश चौहान,आस्क वृद्धाश्रमाचे अध्यक्ष दादासाहेब गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, माऊली सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष कैलास दुधाळे तसेच राजगुरुनगर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष कैलास दुधाळे यांनी केले. सूत्रसंचालन स्वप्ना भुजबळ यांनी तर आभार बाळासाहेब घाटे यांनी मानले.
