Pimpri Chinchwad Police Crime | थरारक गोळीबारानंतर सराईत घरफोड्यांची टोळी जेरबंद!
पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-२ ची धडाकेबाज कारवाई : पिस्तुलातून फायर करणाऱ्या तीन सराईतांना शिताफीने ताब्यात घेतले ; २९ लाखांच्या दागिन्यांसह १२ गुन्हे उघडकीस!
महावार्ता लाईव्ह | घरफोडी व जबरी चोरी करणाऱ्या सराईत तीन आरोपींना मोठ्या सीताफिने पकडून त्यांच्याकडून २९ लाख ४४ हजार ७०० रुपये किमतीचे सोनं-चांदीचे दागिने जप्त करून १२ गुन्हे उघडकीस आणले आहेत. ही यशस्वी कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तलयातील गुन्हे शाखा युनिट 2 ने केली.
याबाबतची सविस्तर घटना पुढील प्रमाणे अशी आहे की मागील काही दिवसांमध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातिल हद्दित रात्रीचे वेळी बंद घरांचे कुलुप तोडुन घरफोडया होण्याचे बरेच प्रकार घडले होते.तेव्हा पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कुमार चौबे यांनी सदर प्रकाराची गंभीर दखल घेवुन गुन्हे शाखेस सदर प्रकारात लक्ष घालुन आरोपी अटक करुन गुन्हे उघडकीस आणून प्रतिबंध करणे बाबत आदेशित केले होते.
त्यानुसार गुन्हे शाखा १ चे सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे,गुन्हे शाखा युनिट २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पोलीस उपनिरीक्षक युरेश साळुंखे आणि गुन्हे शाखा, युनिट-२ चे अंमलदार हे पिंपरी चिंचवड हद्दिमध्ये होत असलेल्या घरफोड्या बाबत तपास करत असताना असे निदर्शनास आले की,हिंजवडी पोलीस ठाणे हद्दिमध्ये एका घरात रात्रीचे वेळी चोरी झाली असुन चोरटयांनी त्या घरातुन MH14 JE 2628 सेलेरिओ गाडीची चावी घेवुन पार्किंग मध्ये लावलेली सेलेरिओ गाडी चोरी करुन घेवुन गेले आहेत.तसेच दिनांक २३/११/२०२५ रोजी रावेत पोलीस ठाणे हद्दिमध्ये त्याच सेलेरिओ गाडी मधुन येवुन घरफोडी करून सोनं-चांदीचे दागिने चोरी करून घेवुन गेल्याने रावेत पोलीस ठाणे, गुन्हा रजिस्टर नंबर ५६९/२०२५ भादवि कलम ३०५, ३३१ (२) प्रमाणे गुन्हा नोंद होता.
तेव्हा गुन्हे शाखा, युनिट-२ चे अधिकारी व अंमलदार यांचे पथक हे दोन्ही घटनांच्या अनुषंगाने तपास करत असताना सदर पथकाने अंदाजे २०० ते २५० सी.सी.टी.व्ही कॅमे-यांची पाहणी केली असता सदरचे आरोपी हे नेहमी चोरी करुन जुन्या पुणे-मुंबई हायवेने सोमाटणे टोल नाक्या वरुन लोनावळयाच्या दिशेने जात असल्याचे केलेल्या तपासात निष्पन्न आले होते
२७ नोव्हेंबर २०२५ रोजी गुन्हे शाखा, युनिट-२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार हे स्वतः रात्री 2 वाजता सोमाटणे टोल नाका येथे जावुन त्यांनी स्वतः नियोजन करुन गुन्हे शाखा, युनिट-२ चे पोलीस उपनिरीक्षक मयुरेश साळुंखे,पोलीस अंमलदार संजय गवारे, तुषार शेटे, विक्रम कुदळ, मोहम्मद गौस नदाफ, भाऊसाहेब राठोड, विक्रांत चव्हाण, कृष्णा शितोळे, प्रशांत सैद, अमर राणे, धनंजय जाधव, सुखदेव गावंडे अशा बारा जणांच्या तीन टीम तयार करुन त्यांना कामे वाटुन दिली. त्याच वेळी साधारण ०५:३० वा सविधान चौक येथिल टिमने कळविले की नमुद वर्णनाची व नंबरची गाडी ही सविधान चौक येथुन पास झाली आहे.काही वेळातच गाडी सोमाटणे टोल नाका लेन नंबर ३ मध्ये आली असता सदर गाडी मधील इसमांना बाहेर येण्यास सांगितले असता गाडीचे पाठी मागे बसलेल्या इसमाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार तसेच अंमलदार यांचे दिशेने फायर केला.परंतु आरोपी आणि अंमलदार यांचे मध्ये झटापट झाल्याने फायर हा गाडीचे वरच्या बाजुस लागल्याने कोणास इजा झाली नाही.त्याच वेळी राठोड यांनी त्याचा हात पकडून त्याचे हातातुन पिस्टल काढून घेतले. त्यानंतर तिन्ही आरोपींना शिताफीने ताब्यात घेतलेची यशस्वी कामगिरी केली.पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे १) सनीसिंग पापासिंग दुधानी वय २४ वर्षे राहणार हडपसर, पुणे व जलसिंग रजपुतसिंग दुधानी वय ३२ वर्षे रा-हडपसर, पुणे आणि मनिष बाबुलाल कुशवाह, वय-२८ वर्षे, राहणार गाव-कैलास, तहसिल कैलास, जिल्हा-मुरायना, मध्य प्रदेश असे असल्याचे सांगुन त्यांचे कडुन २ पिस्टल आणि ७ जिवंत काडतुसे,धारधार हत्यारे तसेच सोन्याचे दागिने जप्त करुन त्यांचे विरुद्ध तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे, गुन्हा रजिस्टर.नंबर-३६५/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १२१(१), ११८(१) सह आर्म अँक्ट ३(२५), ४(२५) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यांचे कडे केलेल्या तपासात त्यांनी रावेत पोलीस ठाणे, गुना रजिस्टर नंबर-५६९/२०२५ भारतीय दंड सहिता कलम-३०५, ३३१ (२) हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना सदर गुन्हयात अटक करुन त्यांच्या कडे कौशल्यपुर्ण तपास करुन त्यांचे कडुन २९ लाख ४४ हजार ७०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले.
आरोपींनी तळेगाव पोलीस ठाणे,चिचंवड पोलीस ठाणे,रावेत पोलीस ठाणे,हिंजवडी पोलीस ठाणे,बाणेर पोलीस ठाणे,कोथरुड पोलस ठाणे,वाकड पोलीस ठाणे, भोसरी एमआयडीसी पोलीस ठाणे,पिंपरी पोलीस ठाणे,निगडी पोलीस ठाणे हद्दीत चोरी केल्याचे पोलिसांनी गुन्हे उघडकीस आणले आहेत.
आरोपींकडून सोन्याचे दागिने विकत घेणारे आरोपी नामे १) किरपानसिंग शितलसिंग दुधानी वय ३७ वर्षे रा.भैरवनाथनगर कुसगाव ता.मावळ जि.पुणे (२) शांताराम ऊर्फ संतोष गुरप्पा कांबळे, वय-३० वर्षे, रा. भैरवनाथनगर कुसगाव ता.मावळ,जि.पुणे (३) अक्षय राजु चनाल, वय-३० वर्षे, रा.शिवाजी पेठ,खंडाळा, ता.मावळ,जि-पुणे यांना अटक करण्यात आली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास गुन्हे शाखा, युनिट-२ चे मयुरेश साळुंखे हे करत आहेत.
तसेच सदरचे आरोपी हे रेकॉर्डवरील घरफोडी व जबरी चोरी करणारे गुन्हेगार असुन आरोपी नामे सनीसिंग पापासिंग दुधानी हा मोक्का जेल रिलिज आरोपी असुन त्याचे वर एकुण-७१ गुन्हे दाखल आहेत, आरोपी नामे जलसिंग रजपुतसिंग दुधानी याचे वर एकुण ५६ गुन्हे दाखल आहेत, आरोपी नामे मनिष बाबुलाल कुशवाह याचे वर एकुण-७१ गुन्हे दाखल आहेत तसेच आरोपी नामे किरपानसिंग शितलसिंग दुधानी याचे वर २३ गुन्हे दाखल आहेत
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे,सह पोलीस आयुक्त डॉ.शशिकांत महावरकर,अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड,पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, डॉ. शिवाजी सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १ चे विशाल हिरे,यांचे मार्गदर्शनाखालील गुन्हे शाखा, युनिट-२, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस उपनिरीक्षक मयुरेश साळुंखे,दिपक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय गवारे, प्रविण दळे,नितिन ढोरजे, पोलीस हवालदार कृणाल शिंदे, तुषार शेटे,मोहम्मद गौस नदाफ,भाऊसाहेब राठोड, विक्रम कुदळ, बाबा चव्हाण, अली शेख, कृष्णा शितोळे, पोलीस शिपाई प्रशांत सैद, सुखदेव गावंडे, अमर राणे, दिनकर आडे, वि पवार, धनंजय जाधव यांनी केली. बारा गुन्हे उघडकीस आणून आणून आरोपींना अटक व सोन्या-चांदीचे दागिने जप्त केल्याबद्दल गुन्हे शाखा 2 चे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन होत आहे.
