कंपनीच्या स्टोअररूमचा पत्रा उचकटून ७४ हजारांचा मला लंपास
भोसरी - न्यूज नेटवर्क
कंपनीमधील स्टोअर रूमच्या छताचा पत्रा उचकटून ७४००० हजारांचा माल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना शेवाळे सेंटर परिसरात घडली.
याविरोधात सतिश रतन सौदागर(वय ३४ रा.भैरवनाथ मंदिर, पुणे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात शनिवार (दि. ९) रोजी फिर्याद दिली असून, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पिंपरी येथील शेवाळे सेंटर परिसरातील बीटमॅपर इंटिग्रेशन टेक्नॉलॉजी कंपनीतील स्टोअर रूमचे छत उचकटून ६००० रुपये चे अॅल्युमिनीअम प्लेट, ६८००० रुपये केबल असे एकुण ७४००० रुपयांचा माल अज्ञात चोरट्याने दि. २ ते ४ एप्रिल दरम्यान चोरून नेला.
याची माहिती कामगार सचिन साळवी यांनी फिर्यादीस फोनद्वारे दिली. फिर्यादी व वरिष्ठ व्यवस्थापक विनायक कुलकर्णी यांनी पाहणी केली. पुढील तपास पिंपरी पोलीस करत आहे.
---------------------------------------------------------------------
