खेड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संजय शेटे यांची बिनविरोध निवड
उपाध्यक्षपदी दै. प्रभातचे पत्रकार रामचंद्र अर्जुन सोनवणे | कार्याध्यक्षपदी साम मराठी टीव्ही न्यूज चॅनेलचे पत्रकार रोहिदास भगवान घाडगे
Sanjay shete | Ramchnadr sonvane | Rohidas gadage
महावार्ता लाईव्ह | खेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्षपदी दै. लोकमतचे पत्रकार संजय तुकाराम शेटे यांची तर उपाध्यक्षपदी दै. प्रभातचे पत्रकार रामचंद्र अर्जुन सोनवणे, कार्याध्यक्षपदी साम मराठी टीव्ही न्यूज चॅनेलचे पत्रकार रोहिदास भगवान घाडगे यांची निवड करण्यात आली.
खेड तालुका पत्रकार संघाची वार्षिक सभा (दि.२६) रोजी खेड पंचायत समितीच्या राजा शिवछत्रपती सभागृहात झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष सुनिल थिगळे होते. सभेच्या प्रारंभी सामाजिक क्षेत्रातील बांधव, सिमेवरील शहीद जवान व दिवंगत ज्ञातअज्ञात देश बांधवांना, श्रद्धांजली अर्पण करून सभेला सुरुवात करण्यात आली. मागील सभेचे इतिवृत्त व जमाखर्चाची माहिती सचिव किरण खुडे यांनी सभेला दिली. त्यास एकमताने मंजुरी देण्यात आली.
सभेत पुढील २०२५-२६ या सालासाठी अध्यक्षपदी लोकमतचे पत्रकार संजय शेटे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. तर सचिवपदी किरण खुडे यांची फेरनिवड झाली. अध्यक्षपदी निवडीनंतर शेटे यांना सर्वानुमते कार्यकारिणी निवडीचे अधिकार देण्यात आले.
नवनिर्वाचित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे
अध्यक्ष :- संजय तुकाराम शेटे.(लोकमत)
कार्याध्यक्ष:- रोहिदास भगवान गाडगे (साम टिव्ही मराठी)
सचिव :- किरण कमलाकर खुडे..(केसरी)
उपाध्यक्ष :- रामचंद्र अर्जुन सोनवणे..(प्रभात)
उपाध्यक्ष :-- निलेश बाळासाहेब आंधळे..(संपादक पुणे ब्रेकिंग न्युज)
सहसचिव :- रोहिदास.होले (संपादक खेड टाईम्स)
कोषाध्यक्ष :- आदेश भोजणे (दै पुढारी)
सहकोषाध्यक्ष :- अशोक कडलक..(प्रभात)
प्रसिद्धी प्रमुख :- इसाक महमंद मुलाणी..(पुढारी )
सल्लागार
दत्ता गुणाजी भालेराव ..(दै पुढारी), सुनिल शांताराम थिगळे (टि.व्ही 9 मराठी), बाळासाहेब शंकर सांडभोर (संपादक नॅशनल मराठी न्यूज), महेंद्र बाबुराव शिंदे (दै.सकाळ),
विद्याधर धोंडीराम साळवे (दै.राष्ट्रनिर्माण), राजेंद्र सुधाकर लोथे...(दै.सकाळ), वनिता महारुद्र कोरे (दै.सकाळ ), संदिप सुदाम मिरजे (दै.प्रभात)
कार्यकारणी सदस्य
नाजीम दस्तगीर इनामदार...(दै.संध्या), अतुल भालेराव (दै.पुण्यनगरी ), सदाशिव अमराळे,(दै.नवराष्ट्र.), किशोर गिलबिले (दै.पुण्यनगरी), प्रभाकर जाधव (दै.नवराष्ट्र.), सोमनाथ नवले (दै.प्रभात), सुभाष लोहोट (दै.प्रभात),
आय्याज तांबोळी (दै.लोकमत), रवि साकोरे (दै.नवराष्ट्र.)
सर्व नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाचे आमदार बाबाजी काळे, माजी आमदार दिलीप मोहीते, भाजप पुणे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर तसेच तालुक्यातील अधिकारी व नागरिकांनी कार्यकारणीला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
