Khed | किवळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात कालवड मृत्युमुखी
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण | वन विभागाने तात्काळ बिबट्याला पकडण्याची मागणी

राजगुरूनगर : किवळे (ता.खेड) गावाच्या आनंदनगर (साळुंकेवस्ती) या ठिकाणी बिबट्याने हल्ला करून कलवडीचा फडशा पाडला.या घटनेने संपूर्ण किवळे गावासह परिसरातील गावात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने तात्काळ बिबट्याला पकडण्याची मागणी नागरिकांनी केली.
शेतकरी अंबादास दत्तात्रय साळुंके यांच्या गोठ्यातील कलवडीवर बिबट्याने (दि.१८) रोजी पहाटेच्या सुमारास हल्ला केला.या हल्ल्यात कालवडीचा जागीच मृत्यू झाला.वनाधिकारी बढे यांनी घटनेचा पंचनामा केला.शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी पशुधन मालक शेतकऱ्याने केली आहे. कोरेगाव बुद्रुक,चांदुस,पिंपरी बुद्रुक,कुरकुंडी,आसखेड बुद्रुक, शेलू,आसखेड खुर्द या गावच्या परिसरात बिबट्याचा वावर आहे. वरील गावच्या परिसरातील शेतातील पीके खुरपणीस आली आहेत.
बिबट्याच्या भीतीने मंजूर वर्ग शेतातील कामे करण्यास धजावट नाही.शेतमजूर यांच्या मनात बिबट्याची भीती दडली आहे.बिबट्याचा बंदोबस्त होणे ही काळाची गरज आहे.बिबट्याची प्रचंड भीती निर्णय निर्माण झाल्याने माळरानावर जनावरे चारण्यासाठी गुराखी देखील जात नाहीत.वरील गावच्या परिसरात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बिबट्याचा वावर ऊस क्षेत्रात असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे.
वन विभागाने लवकरात लवकर पिंजरा लावून बिबट्याला पकडावे.बिबट्याला पकडल्याच्या कारवाईने गावातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या मनातील भीती दूर होईल.शेतकऱ्यांना मनमोकळे पणाने शेतातील कामे करता येतील.बिबट्याला तात्काळ पकडण्याची मगणी किवळे ग्रामस्थांचे वतीने युवानेते स्वप्नील बाळासाहेब साळुंके यांनी केली आहे.