शिवे गावच्या सरपंचपदी अक्षय शिवेकर यांची बिनविरोध निवड

शिवे गावातील इतिहासातील सर्वात तरुण सरपंच होण्याचा मान

शिवे गावच्या सरपंचपदी अक्षय शिवेकर यांची बिनविरोध निवड

राजगुरुनगर : खेड तालुक्यातील पश्चिम भागातील मोठी असलेली शिवे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी अक्षय चांगदेव शिवेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शिवे गावातील इतिहासातील सर्वात तरुण सरपंच होण्याचा मान शिवेकर यांना मिळाला. बिनविरोध निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांनी एकत्र येत जल्लोष करून आनंद व्यक्त केला.

ठरल्याप्रमाणे मावळते सरपंच ज्ञानेश्वर शिवेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेत शिवेकर यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध निवड करण्यात आली.सरपंचपदाच्या निवडणुकीचे कामकाज विस्तार अधिकारी सेवक थोरात व ग्रामसेवक कोरडे यांनी यांनी पाहिले.सरपंचपदाची निवडणुक ग्रामपंचायत कार्यालय सभागृहात पार पडली. नवनिर्वाचित सरपंच अक्षय शिवेकर यांचा सत्कार ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.

यावेळी मावळते सरपंच ज्ञानेश्वर शिवेकर , उपसरपंच कविता शिवेकर, निर्मला कोळेकर, आनंदा साकोरे हे पाच सदस्य उपस्थित होते.अन्य चार सदस्य गैहजर होते. निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी खेड पंचायत समितीचे सभापती चांगदेव शिवेकर, माजी सरपंच शांताराम शिवेकर, नामदेव शिवेकर आदी ग्रामस्थ यांनी प्रयत्न केले.