वराळे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी पुजाताई विश्वासराव बुट्टेपाटील यांची बिनविरोध निवड
वराळे ग्रामपंचायतीच्या इतिहासात प्रथमच पती- पत्नी यांनी सरपंच होण्याचा मान मिळविला आहे.
राजगुरूनगर : एमआयडीसी क्षेत्रातील आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या खेड तालुक्यातील वराळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ.पुजाताई विश्वासराव बुट्टे पाटील यांची बिनविरोध निवड झाली.निवडीनंतर मिरवणुकीत डीजे लावून आणि गुलाल भंडारची मुक्तपणे उधळण करीत जल्लोष करण्यात आला. पुजाताई यांची बिनविरोध निवड होताच गावातील शेकडो महिलांनी ग्रामपंचायत कार्यालय येथे गर्दी करून त्यांचा सत्कार करीत शुभेच्छा दिल्या आहेत.

ठरल्याप्रमाणे दिनेश लांडगे यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त सरपंचपदाची निवडणूक वराळे ग्रामपंचायतीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी गणेश सोमवंशी यांचे अध्यक्षतेखाली सोमवारी (दि.९) संपन्न झाली.निर्धारित वेळेत सरपंचपदाचे नामनिर्देशनपत्र बुट्टे पाटील यांचेच एकमेव दाखल होते.त्यामुळे त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा सभागृहात सदस्यांच्या उपस्थितीत सोमवंशी यांनी केली.त्यानंतर नवनिर्वाचित सरपंच पुजाताई बुट्टे पाटील यांचा फेटा बांधून शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. निवडणूक कामात मदत तलाठी बंडेश औटी यांनी मदत केली.तर निवडणुकीचे प्रशासकीय कामकाज ग्रामसेवक विकास विशे यांनी पाहिले.

निवडणूक प्रसंगी सभागृहात मावळते सरपंच दिनेश लांडगे,उपसरपंच बाळासाहेब ठाकर,ग्रामपंचायत सदस्य अविनाश लोंढे,सुनीता ठाकर,उज्वला चव्हाण हे सहा जण उपस्थित होते.तर शुभांगी बुट्टे ह्या सदस्या मात्र गैरहजर राहिल्या.तसेच निवडणूकवेळी माजी जिप सदस्या सुरेखा ठाकर, माजी सरपंच विश्वास बुट्टे पाटील, नारायण आंद्रे,रामचंद्र काकडे,रघुनाथ चव्हाण,गोविंद बुट्टे,पोपट बुट्टे,संतोष जाधव,नंदकुमार चव्हाण,सुरज कामठे,समीर बुट्टे,दिलीप बुट्टे,कानिफनाथ आंद्रे आदी उपस्थित होते.
