राजगुरुनगर येथे रक्तदान शिबिर संपन्न

मित्रांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्तने सर्व मित्र परिवारांकडून भव्यरक्तदान शिबिराचे आयोजन .

राजगुरुनगर येथे रक्तदान शिबिर संपन्न


राजगुरुनगर : स्वर्गीय महेंद्र नगरकर,अक्षय फुलावरे,सौरभ भोसले यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्तने सर्व मित्र परिवारांकडून भव्यरक्तदान शिबिराचे आयोजन राजगुरुनगर (राहूलचौक )येथे करण्यात आले होते.या रक्तदान शिबिरात असंख्य युवकांनी सहभाग घेतला होता. या शिबिराचे उद्घाटन नगरकर, फुलावरे,भोसले यांच्या आई - वडिलांच्या हस्ते करण्यात आले. दोनशे रक्तदान करणाऱ्यास भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष कैलास सांडभोर,शहराध्यक्ष सुभाष होले,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सुधीर भोमाळे,नगरसेवक मंगेश गुडांळ, भाजपा माथाडीचे जिल्हाध्यक्ष मिलिंद जगदाळे,बाळासाहेब सांडभोर,इजाजभाई तांबोळी, दिपक शितोळे,मित्रसेन डोंगरे,सागर सातकर, संतोष भांगे, राहुल पिंगळे, बाप्पू सातकर,मच्छिन्द्र पवळे,भाऊसाहेब वाळदंडे,पप्पू बनसोडे,वैभव नाईकरे  ग्रामस्थ व तरुणवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.