करंजविहिरे शाळेत विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत.

करंजविहिरे शाळेत विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत.

राजगुरूनगर - प्रतिनिधी
           करंजविहिरे (ता.खेड) येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेचा गणवेश व खाऊ वाटप करून सर्वच विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
       यावेळी करंजविहिरे गावचे सरपंच सुदाम कोळेकर,    ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब शिवेकर,रमेश बोऱ्हाडे, बाबाजी कोळेकर,निलेश कोळेकर,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळू मरगज,उपाध्यक्ष विश्वनाथ शिवेकर   शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता धुमाळ,शिक्षक बाजीराव राळे,संदीप आव्हाड,प्रणाली नेहुलकर,सुवर्णा वांभुरे व  ग्रामस्थ उपस्थित होते.दीड वर्षानंतर शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.