समाजाची सेवा किंवा विकासाची कामे करण्यासाठी पक्ष ही एक व्यवस्था : गटनेते शरद बुट्टे पाटील
राजगुरूनगर : प्रतिनिधी
विकास न थांबणारी प्रक्रिया असून गावांचा शाश्वत विकास झाला पाहिजे.रस्ते विकास योजनेचा सर्व्हे २०२२ मध्ये होणार असल्याने अनेक रस्ते प्लॅनमध्ये येण्यासाठी गावच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत.समाजाची सेवा किंवा विकासाची कामे करण्यासाठी पक्ष ही एक व्यवस्था असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे गटनेते शरद बुट्टे पाटील यांनी वेताळे (ता.खेड) येथे केले.
वेताळे येथील दत्त मंदिराशेजारी शेड व ग्रामपंचायत कार्यालय परीसरात पेव्हिंग ब्लॉक बसविणे या कामांचे भूमिपूजन प्रसंगी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या तनुजा घनवट, माजी पंचायत समिती सदस्य बी.के.कदम,सरपंच सविता बोंबले,उपसरपंच योगेश बोंबले,माजी सरपंच बंडू बोंबले, विठ्ठल बोंबले,कविता बोंबले,शुभांगी बोंबले,रेखा राव, सुनील बोंबले,दिलीप बोंबले,दत्तात्रय बोंबले, बांधकामचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

तनुजा घनवट म्हणाल्या,जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक गावांना निधी देता आला.गावांना निधी देताना काही वेळेस अडचणी येतात.परंतु मार्ग काढून विकास केला जातो.अनेक गावांत मी आणि शरद बुट्टे पाटील यांनी निधी टाकला.आमचा पक्ष वेगळा असला तरी आमच्यात मतभेद नसल्याचे सांगितले.
-----------------------------------------------------------------------------
तनुजाताई घनवट यांनी मागेल त्या कामांना निधी दिला. आदर्श गाव बनविण्यात त्यांचा हातभार आहे.बंधारा,एसटी बस शेड,स्मशानभूमी सुशोभीकरणासह अनेक विकासाच्या मागण्या ग्रामपंचायत सदस्य बाबाजी वाळुंज केल्या.
गावात विकासाची कामे प्राधान्याने केली जातील.गाव विकास प्रक्रियेने पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सरपंच सविता बंडूशेठ बोंबले यांनी सांगितले.
-----------------------------------------------------------------------------
आमची जिल्हा परिषदेची शाळा जुनी इमारत आहे. शिकेल तो टिकेल या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या म्हणण्यानुसार आमची शाळा इमारत झाली पाहिजे,अशी मागणी कविता बोंबले यांनी बोलताना केली.
-----------------------------------------------------------------------------
शरदभाऊ बीजेपीचे काम करतात आणि मी सेनेचे काम करतोय.परंतु ते पक्ष व गट तट न पाहता विकासकामे करतात.असे सुनील बोंबले म्हणाले.
-----------------------------------------------------------------------------
सूत्रसंचालन बी.के.कदम यांनी केले.आभार दिलीप बोंबले यांनी मानले.
------------------------------------------------------------------------------
