राजगुरू महाविद्यालयात एड्स जनजागृती रॅलीचे आयोजन
रेड रिबीन क्लब व आयसीटीसी ग्रामीण रुग्णालय चांडोली, साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालय यांच्या वतीने जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन
राजगुरुनगर : हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, रेड रिबीन क्लब व आयसीटीसी ग्रामीण रुग्णालय चांडोली, साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालय यांच्या वतीने जागतिक एड्स दिनानिमित्त एड्स जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी प्राचार्य डॉ शिरीष पिंगळे, डॉ. एच.एम.जरे, चांडोलीच्या ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक डॉ. महेंद्र गरड, लॅब टेक्निशियन अल्ताफ पठाण, एन.सी. डी. विभागाचे समुपेशक योगेश बोरडकर, उपप्राचार्य डॉ. संजय शिंदे उपस्थित होते.
आय.सी.टी.सी. विभागाचे समुदेशक मुख्तार शेख यांनी एचआयव्ही, एड्स जनजागृतीबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली तसेच एड्सग्रस्तांशी मानवतेच्या दृष्टिकोनातून वागण्याची शपथ दिली. या उपक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. गणेश धुमाळ, डॉ. प्रभाकर जगताप व डॉ. कीर्ती नितनवरे यांनी केले.
