राजगुरूनगर सहकारी बँकेच्या निवडणूकीचे मतदान शांततेत : उद्या निकालाची उत्सुकता

राजगुरूनगर सहकारी बँकेच्या निवडणूकीचे मतदान शांततेत : उद्या निकालाची उत्सुकता

राजगुरूनगर : राजगुरूनगर सहकारी बँकेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया आज पार पडली. त्यात बँकेच्या १७ शाखापैकी १५ ठिकाणी २९ हजार २१९ सभासद मतदारांनी एकूण ६४ मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.  एकूण मतदानाची टक्केवारी बघता ५७ टक्केच मतदान झाल्याची नोंद झाली आहे. बँकेच्या मतदान प्रक्रियेला अल्प प्रतिसाद मिळाल्याची चर्चा खेड तालुक्यात रंगू लागली आहे. 

 एकूण मतदानाची टक्केवारी बघता उमेदवारांच्या मनातील धाकधूक वाढली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या निवडणुकीत सरळ लढतीत भीमाशंकर सहकार पॅनल व राजगुरूनगर सहकार परिवर्तन पॅनलमध्ये चुरस पाहावयास मिळाली. यात दोन्ही पॅनलच्या उमेदवारांचे भवितव्य आज मतदान पेटीत बंद झाले आहे.

एकूण मतदान केंद्रे व झालेल्या मतदानाची आकडेवारी.
शिरूर -२०९
पुणे -१३३
आळंदी -१७५
जुन्नर - ८०
पाईट - १९५
देहू रोड - ५३२
कडूस -१८६१
आळेफाटा -१००
मंचर - ३३४
जुन्नर -७१
पाबळ - २५७
नारायणगाव -६९०
भोसरी - ७३९
चाकण -२९८५
म्हाळुंगे - २५२
राजगुरूनगर - ८०२८
----------------
एकूण :- १६६४१