सरपंचांनी धाडसाने पुढे येऊन गावात आव्हानात्मक कामे उभी करावीत : गटनेते शरद बुट्टे पाटील

जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर असताना माझे व्याख्यान मोहकल येथे होत आहे,काहींना वाटेल की शरद बुट्टे पाटील या गटात उभे रहातात की काय ? माझा जिल्हा परिषद गट सोडून मी तालुक्याच्या अनेक गावांत विकासकामांना निधी दिला त्याचा मी कधी गवगवा केला नाही. दिलेला शब्द पाळून विकासकामे करण्याचे आपले धोरण असल्याचे त्यांनी सांगितले. मोहकल ग्रामस्थ सांगतील त्या कामाला पाहिजे तेवढा निधी देण्याचे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना यावेळी दिले.

सरपंचांनी धाडसाने पुढे येऊन गावात आव्हानात्मक कामे उभी करावीत : गटनेते शरद बुट्टे पाटील

राजगुरूनगर : प्रतिनिधी
गावात विकासकामे करण्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्वाचे आहे.मनातील इच्छाशक्ती जागृत झाली आणि सकारात्मक दिशा मिळाली की अनेक समाजपयोगी कामे सहजपणे मार्गी लागतात.ओस पडत चाललेली खेडी आणि सूज आलेल्या शहरांमध्ये गुळगुळीत रस्ते म्हणजे विकास नाही.तर प्रत्येक गावात शाश्वत विकास झाला पाहिजे. गाव पातळीवर कामे करण्याचे सर्वाधिकार गावच्या सरपंचाला असल्याने सरपंचांनी धाडसाने पुढे येऊन आव्हानात्मक कामे उभी करावीत.असे प्रतिपादन पंचायतराज विषयाचे अभ्यासक व पुणे जिल्हा परिषदेचे गटनेते शरद बुट्टेपाटील यांनी मोहकल येथे केले.
      मोहकल ग्रामपंचायतीने विजयादशमी (दसरा) सणाचे औचित्य साधून 'आमचं गाव- आमचा विकास,योजना आणि लाभार्थी यांची सांगड' या विषयावर आयोजित व्याख्यान कार्यक्रमात सरपंच,उपसरपंच व सदस्यांना मार्गदशन करताना ते बोलत होते.यावेळी मोहकलच्या सरपंच आश्विनी भागवत, उपसरपंच नवनाथ राऊत, कमानचे सरपंच योगेश नाईकरे, कान्हेवाडी सरपंच बबन कोबल, वाशेरेचे सरपंच संभाजी कुडेकर, कडधे उपसरपंच केतन चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य नितिन राऊत, मंदा थोरात,जगदिश राऊत,सुदाम रणपिसे,साहेबराव रनपिसे, आदिनाथ रणपिसे,दत्ता राऊत, बाळासाहेब राऊत,बबन राऊत, काळूराम वाळुंज,युवानेते संतोष राऊत,कमान उपसरपंच मोनिका नाईकरे,माजी सरपंच मारुती भागवत,माजी सरपंच अशोक नाईकरे,संजय रौधळ,कैलास (मुन्ना) नाईकडे,दत्ता रुके,संदिप मीरजे,विकास मडंलीक,लता हुंडारे,पाडुंरंग सहाणे,शिल्पा राऊत,अनिता राऊत,मालन रणपिसे,मच्छिंद्र रोकडे,मारुती राऊत,रामभाऊ राऊत आदी मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते.


     मार्गदशन करताना बुट्टे पाटील पुढे म्हणाले,आपल्या हक्कांवर गदा येऊ देऊ नका,हक्क अबाधीत ठेवून धाडसाने कामे करा.गावात अनेक प्रकारच्या विचारांची माणसे असतात. एखादे काम हाती घेतले तर होणार नाही,सुरू झाले तर पूर्ण होणार नाही आणि काम पूर्ण झाले तर चांगले झाले नाही अशा पद्धतीने वागणारी व विकासाला मारक ठवणारी माणसे प्रत्येक गावात आहेत.परंतु सर्वांवर मात करून गावात विकासकामे करण्यासाठी प्रयत्नशील राहावे. एखाद्याने केलेल्या कामांमुळे गावाचा चेहरामोहरा बदलला तर माणसे आयुष्यभर नाव काढतात. आपल्या पाठीमागे आपले नाव सदैव निघेल यासाठी लोकोपयोगी असणारी चिरंतन कामे करण्याचे आवाहन त्यांनी केले.
         ते पुढे म्हणाले,खासदार, आमदार,जिल्हा परिषद सदस्य हे कोणत्याही पक्षाचे असुद्या त्यांच्याकडे जाऊन निधी आणला पाहिजे.गावचे नागरिकांनी गावचा विकास साधताना राजकारण बाजूला ठेवा.दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांच्या प्रगतीसाठी प्रयत्न गरजेचे आहेत.ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी विशेषतः प्रशिक्षणे,मासिक मिटिंगा चुकवू नयेत.ग्रामसभेला मोठे महत्व असल्याने ग्रामपंचायतींच्या ग्रामसभा झाल्याच पाहिजेत. प्रशासन समजून घेतले की कोणतेही काम करण्याला अडचणी येत नाहीत.एखाद्या कामाला आडकाठी येत असेल तर वेळ प्रसंगी मंत्रालयात जाऊन काम मार्गी लावण्याचे धाडस करा आणि का होत नाही म्हणून संबंधितांशी बिनधास्त बोलले पाहिजे.असे सांगून ते पुढे म्हणाले,प्रशासनातील अधिकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवले तर कामांना अडचणी येत नाहीत आणि कामेही लवकर मार्गी लागतात.सरपंच,उपसरपंच,सदस्यांकडे स्वतःचे नावाचे लेटरहेड आणि कागदपत्र ठेवण्यासाठी फाईल महत्वाची आहे. ग्रामपंचायतीचे पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून एकजुटीने गावचा सर्वांगीण विकास करण्याचे धोरण ठरविले, तर गावांचा कायापालट होईल. असे महत्वपूर्ण विचार शरद बुट्टेपाटील यांनी व्यक्त केले.
      ग्रामविकास,केंद्र व राज्याच्या गाव पातळीवरील योजना, शिक्षण,महिला बालकल्याण, समाजकल्याण,बचतगट, पशुसंवर्धन,सरपंच व सदस्यांचे अधिकार या विषयी बुट्टेपाटील यांनी सविस्तरपणे मार्गदर्शन केले.
      कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्ता रुके यांनी केले.आभार माजी उपसरपंच संदीप मिरजे यांनी मानले.


------------------------------------------------------------------------------