शेलु ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अक्षय गाडे
राजगुरूनगर : खेड तालुक्यातील शेलु ग्रामपंचायत उपसरपंचपदाची निवडणूक पोलिसांच्या अतिशय कडक बंदोबस्तात पार पडली. मतदानाद्वारे झालेल्या निवडणूकित अक्षय बाळू गाडे हे एक मताने विजयी होऊन त्यांची उपसरपंचपदी निवड झाली.तर प्रतिस्पर्धी कोमल सुनील पडवळ यांचा एक मताने पराभव झाला.
संपत पडवळ यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिला होता.रिक्त उपसरपंचपदाची निवडणूक शेलु ग्रामपंचायतीच्या सभागृहात सरपंच अक्षय पडवळ यांचे अध्यक्षतेखाली (दि.२८) संपन्न झाली.उपसरपंचपदाचे नामनिर्देशनपत्र अक्षय पडवळ व कोमल पडवळ यांनी निर्धारित वेळेत दाखल केले.कुणीही माघार न घेतल्याने निवडणूक घेण्यात आली.ग्रामपंचायतीचे ९ पैकी सात सदस्य सभागृहात उपस्थित होते.गुप्त पद्धतीने मतदान होऊन मतमोजणीत अक्षय गाडे यांना चार मते मिळाली.तर प्रतिस्पर्धी कोमल पडवळ यांना तीन मते पडली.एक मताने गाडे विजयी होऊन त्यांची उपसरपंचपदी निवड झाली.ग्रामसेवक तानाजी पाटील यांनी प्रशासकीय कामकाज पाहिले.निवडीनंतर गाडे यांचा सत्कार सभागृहात करण्यात आला.निवडणूक प्रसंगी पोलिसांचा कडक बंदोबस्त होता.
निवडणुकवेळी सभागृहात सरपंच अक्षय पडवळ, नवनिर्वाचित उपसरपंच अक्षय गाडे,सदस्य योगेश सांडभोर, प्राजक्ता बधाले,मंजुळा गावडे, कोमल पडवळ,अर्चना चोरघे असे सात जण उपस्थित होते.तर मावळते उपसरपंच संपत पडवळ व रुपाली कचाटे हे दोनजण गैरहजर होते.
भविष्यात गावामध्ये विकासाची कामे करून गावाची प्रगती करून गाव विकास प्रक्रियेने पुढे नेऊ असे अक्षय गाडे यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले.
