खेड - आळंदी विधानसभेत पक्ष विरहित काम केल्याने खेड बाजार समितीच्या उपसभापतींवर भाजपाने केली कारवाई

खेड - आळंदी विधानसभा निवडणुकीत पक्ष विरहित काम केल्याचे निदर्शनास आल्याने सोमवंशी व अपक्ष उमेदवारावर भाजपने केली तात्काळ कारवाई

खेड - आळंदी विधानसभेत पक्ष विरहित काम केल्याने खेड बाजार समितीच्या उपसभापतींवर भाजपाने केली कारवाई

 

महावार्ता लाईव्ह | खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान उप सभापती क्रांती सोमवंशी आणि त्यांचे पती संदीप सोमवंशी आणि अपक्ष निवडणूक लढवीत असलेले उमेदवार अमर बोऱ्हाडे हे भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही पदावर नाहीत आणि पक्षाने त्यांच्यावर कसलीही जबादारी दिलेली नाही.यापूर्वी दिलेल्या जबाबदाऱ्या तात्पुरत्या स्वरूपाच्या त्यांच्या जबाबदाऱ्या त्या कार्यकाळात संपुष्टात आलेल्या आहेत.असे प्रसिद्धीसाठी पत्रक पुणे जिल्हा भाजपचे सरचिटणीस श्रीकृष्ण देशमुख काढले आहे.यामुळे क्रांती सोमवंशी व संदीप सोमवंशी आणि बोऱ्हाडे यांची भाजपाने तडकाफडकी निर्णय घेऊन पक्षातून ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एकप्रकारे हकालपट्टी केली.पक्षाकडून कारवाईमुळे सोमवंशी व बोऱ्हाडे यांना हा एकप्रकारे जबरदस्त धक्का बसला आहे.

 

महायुती पक्षाचे उमेदवार यांचा प्रचार करण्याचे सोडून सोमवंशी हे विरोधी पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांच्या प्रचार प्रकियेत सहभागी असल्याचा ठपका  पक्षाने ठेवत खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती क्रांती सोमवंशी व त्यांचे पती संदीप सोमवंशी यांच्यावर कारवाई करण्यात आली.तसेच अपक्ष उमेदवार अमर बोऱ्हाडे खेड - आळंदी विधानसभेत महायुतीचे उमेदवार असताना स्वतः अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात भारतीय जनता पार्टीचे नाव व चिन्हाचा उपयोग करू नये अशी पत्राद्वारे सूचितही करण्यात आले.भाजपाचे जिल्हा सरचिटणीस श्रीकृष्ण देशमुख यांनी जिल्हाध्यक्ष यांच्या सुचेनवरून ही कारवाईचा निर्णय तडकाफडकी घेऊन पत्रक प्रसिद्ध केले.पक्षाच्या निर्णयाने सोमवंशी व बोऱ्हाडे यांना जबरदस्त धक्का बसला आहे.