कमलाई ग्रंथालय व अभ्यासिका विद्यार्थ्यांना प्रेरणादायी : वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे

कमलाई ग्रंथालय व अभ्यासिका विद्यार्थ्यांना प्रेरणादायी : वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे

कमलाई ग्रंथालय व अभ्यासिका विद्यार्थ्यांना प्रेरणादायी : वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे

राजगुरुनगर  : प्रतिनिधी
'सर्वश्रेष्ठ धन म्हणजे ज्ञानदान असून ग्रंथालयाचे स्थान सर्वात मोठे आहे.अभ्यासिका ही दीपस्तंभासारखी असल्याने या पवित्र ज्ञानाचे मंदिरात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी Mpsc व Upsc या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करावा,असे प्रतिपादन राज्य लोकसेवा आयोगाच्या मुलाखत पॅनेलचे सदस्य व पुणे विभागाचे वनसंरक्षक रंगनाथ नाइकडे यांनी केले.
       खेड तालुका विद्या विकास प्रतिष्ठान वराळे (ता.खेड) येथील लर्निंग ट्री इंग्लिश मीडियम शाळेच्या इमारतीत स्व.कमल आनंदराव बुट्टेपाटील यांचे स्मरणार्थ उभारलेल्या 'कमलाई ग्रंथालय व अभ्यासिका' उदघाटन नाईकडे यांचे हस्ते शुक्रवारी (दि.२४) झाले.त्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.तसेच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना IAS अधिकाऱ्यांनी लिहलेली पुस्तकांसह नोटबुक वितरित केले.यावेळी जिल्हा परिषदेतील गटनेते शरद बुट्टे पाटील, जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे,प्रतापराव पाटील, बाजार समितीचे माजी संचालक कैलास टाकळकर,जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी संजय कोरगंटीवार,सरपंच दिनेश लांडगे,माजी सरपंच विश्वास बुट्टे पाटील,खेड तालुका विद्या विकास प्रतिष्ठान संस्थेचे उपाध्यक्ष कचरदास येवले,सचिव कैलास टाकळकर,सहसचिव इसाक मुलानी,खजिनदार संदीप मिरजे,सुनीता बुट्टे पाटील,पालक संघाचे अध्यक्ष सुनील देवकर, संजय रौन्धळ,दत्तात्रय टेमगिरे, रोहित डावरे पाटील,आबासाहेब सांडभोर,संतोष कड,सुदाम सोंडेकर,कानिफनाथ आंद्रे, विकास बुट्टे पाटील आदीसह विद्यार्थी,पालक उपस्थित होते.
     मार्गदर्शन करताना नाईकडे म्हणाले,दहावीनंतर शिक्षणाच्या अनेक वाटा फुटतात.परंतु सर्वात महत्वाची दिशा पदवीधर नंतर मिळते.कितीही मोठे अधिकारी झाले तरी माणसाने मागे वळून पहावे.योग्य वेळी मिळालेल्या संधीचे सोने करा नाहीतर,जीवन असफल होईल.

         ते पुढे म्हणाले १५ हजार पाचशे जागा शासन भरणार असून त्यामध्ये एक जागा आपल्याला मिळेल या हेतूने विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा.कोणत्याही प्रसंगात माणसाने खचून जाता कामा नये.लोकसेवा आयोगाची एकदा परीक्षा पास झाले की पुन्हा परीक्षा द्यावी लागत नसून प्रशासकीय सेवा स्थिर आहे,असेही नाईकडे यांनी सांगितले.

     सूत्रसंचालन अविनाश चव्हाण यांनी केले.आभार कैलास टाकळकर यांनी मानले.
-----------------------------------
शरद बुट्टे पाटील हे हुशार व अनुभवी असणारे कर्तबगार जिल्हा परीषद सदस्य आहेत. विकास प्रक्रियेने पुढे गेलेला त्यांचा जिल्हा परीषद गट राज्यात विकासाचे मॉडेल ठरणार आहे.जिल्हा परिषद कशी चालवायची हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे.आज त्यांच्या शैक्षणिक संस्थेत कार्यक्रमानिमित्त येण्याचा योग आल्याने मी येथून काहीतरी घेऊन जाणार आहे.
वीरधवल जगदाळे - जेष्ठ सदस्य,पुणे जिल्हा परिषद
.
-----------------------------------------
तालुक्याच्या ग्रामीण भागातील तरुणांकडे खूप टॅलेंट आहे.म्हणून होतकरू तरुणांना योग्य दिशा देण्यासाठी 'कमलाई ग्रंथालय व अभ्यासिका'आमच्या आई स्व.कमल आनंदराव बुट्टे पाटील यांच्या स्मरणार्थ उभारली आहे.या पवित्र अभ्यासिकेच्या दालनात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाहिजे ते पुस्तक उपलब्ध करून दिले जाईल.अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना मदत करणार आहे.
शरद बुट्टे पाटील - सदस्य,पुणे जिल्हा परिषद
.