खेड तालुका किसान काँग्रेस तालुका "अध्यक्षपदी" सुभाष काळूराम होले यांची निवड
राजगुरूनगर : प्रतिनिधी
खेड तालुका किसान काँग्रेस तालुका अध्यक्षपदी सुभाष काळूराम होले यांची निवड झाली झाली.निवडीबद्दल त्यांचे तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले.
पुणे येथील काँग्रेस भवन येथे शुक्रवारी (दि१२) जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकाती यांचा मेळावा होता.राष्ट्रीय समन्वयक व ऑल इंडिया किसान काँग्रेस कमिटी सदस्य आणि पश्चिम महाराष्ट्र प्रभारी प्रकाश घाळे यांचे प्रमुख उपस्थितीत व पुणे जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गोरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन होले यांची निवड करण्यात आली.यावेळी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल दौडकर,अल्पसंख्याकचे तालुकाध्यक्ष जमीर काझी,बाळासाहेब गायकवाड,दीपक थिगळे आदी तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
खेड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विजय डोळस,पंचायत समितीचे सदस्य व माजी उपसभापती अमोल पवार,माजी उपसभापती सतीश राक्षे,माजी पंचायत समिती सदस्य किरण आहेर,अँड सोमनाथ दौडकर,माजी जि.प.सदस्या वंदना सातपुते,भीमशक्ती तालुकाध्यक्ष अनिल जाधव आदीसह तालुक्यातील काँग्रेसच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सुभाष होले यांचे निवडीबद्दल स्वागत केले.
किसान काँग्रेसच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नसून त्यांचे प्रश्न सोडविणार आहे.केंद्र व राज्याच्या शेती विषयक व लाभाच्या योजना शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे होले यांनी सांगितले.
------------------------------------------------------------------------
