राज्यस्तरीय यशवंत गौरव पुरस्कारने सरपंच पुजा बुट्टेपाटील सन्मानित
ग्राम पातळीवर,सामाजिक क्षेत्रात केलेले यशस्वी काम आणि शासनाच्या माध्यमातून गावात अनेक लोकोपयोगी कामे मार्गी लावली. या कार्याची दखल घेत पुरस्कार प्रदान

Puja butte patil receiving the award
महावार्ता लाईव्ह | कोल्हापूर जिल्ह्यातील अविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय " यशवंत गौरव " पुरस्कार खेड तालुक्यातील वराळे गावच्या विद्यमान सरपंच पुजा विश्वास बुट्टे पाटील यांना प्रदान करण्यात आला.
ग्राम पातळीवर व सामाजिक क्षेत्रात केलेले यशस्वी काम आणि शासनाच्या माध्यमातून गावात अनेक लोकोपयोगी कामे मार्गी लावली. या कार्याची दखल घेऊन पूजा बुट्टे पाटील यांना अविष्कार फाउंडेशन करून राज्यस्तरीय यशवंत गौरव पुरस्कार देण्यात आला.तसेच नवी दिल्ली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्लोबल इन्स्टिटयूट या केंद्र शासनाच्या संस्थेकडून देखील " राष्ट्रीय उत्कृष्ट सरपंच पुरस्कार " केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचे हस्ते मिळाला आहे.
अविष्कार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय पवार, आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन सुवर्णपदक विजेते धावपटू केनेथ कीर्तीजी केनिया, नितीनकुमार भरगुडे, सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक गुरव, पुणे जिल्हा परिषद व यशदा मधील प्रशिक्षक मनीषा खरात, सातारा जिल्हा परिषदेचे प्रशासक अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत बुट्टे पाटील यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्कार मिळाल्याबद्दल पूजा बुट्टे पाटील यांचे वराळे ग्रामस्थ व खेड तालुक्यातील सरपंच परिषदेचे सरपंच ,उपसरपंच यांनी अभिनंदन केले. खेड तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्या सुरेखा ठाकर, गोणवडी माजी सरपंच वैशाली काळे, मनीषा बुट्टे पाटील यांचे उपस्थितीत बुट्टेपाटील यांनी पुरस्कार स्वीकारला.
नवी दिल्लीतील केंद्र शासनाचा व कोल्हापूर येथील राज्यस्तरीय पुरस्काराने काम करण्यासाठी ऊर्जा मिळाली असून भविष्यात अनेक कामे गाव पातळीवर करणार असल्याचे सरपंच पुजा बुट्टे पाटील यांनी सांगितले.