Aalandi | दोन लहान मुलांवर अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना उघडकीस

बहीण - भावावर गुन्हा दाखल ; आरोपी भावाला पोलिसांनी केली अटक

Aalandi | दोन लहान मुलांवर अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना उघडकीस

 

आळंदी | तीर्थक्षेत्र आळंदीमधील गुरुकुलमध्ये दोन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची खळबजनक घटना घडली आहे. विशेष म्हणजे संस्थेत पाहुणा म्हणून आलेल्या अठ्ठावीस वर्षीय तरुणाने संस्थेत शिकत असलेल्या बारा वर्षीय दोन मुलांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. शनिवारी (दि. ४) मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पीडित बारा वर्षीय मुलाच्या आईने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

महेश नामदेव मिसाळ मामा (वय.२८ वर्षे,रा. खोकरमोहा, ता.शिरूरकासार,जि. बीड) आणि त्याची बहीण ऋतुजा भीमराव दराडे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी हद्दीतील वडगाव रस्त्याला ज्ञानेश्वरी गुरुकुल संस्था आहे. त्या संस्थेत आरोपी हा पाहुणा म्हणून आलेला होता. शनिवारी मध्यरात्री आरोपी हा पीडित मुलांच्या खोलीत येऊन त्यांच्या शेजारी झोपला. दरम्यान त्याने दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. पोलिसांनी महेश मिसाळ या आरोपीला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षण भीमा नरके यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास केला जात आहे.