Chakan | भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ताशेठ खांडेभराड यांच्या कृष्णांगी कन्येच्या वाढदिवसानिमित्त्त नेत्र तपासणी शिबिर संपन्न

१५० आदिवासी नागरिकांची नेत्र तपासणी | नागरिकांनी केले समाधान व्यक्त

Chakan | भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ताशेठ खांडेभराड यांच्या कृष्णांगी कन्येच्या वाढदिवसानिमित्त्त नेत्र तपासणी शिबिर संपन्न

राजगुरूनगर : कडाचीवाडी-चाकण येथील प्रतिथयश उद्योजक व भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ताशेठ खांडेभराड यांनी आपल्या कृष्णांगी कन्येच्या वाढदिवसानिमित्त आयोजित नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाले.या शिबिरात जवळपास दिडशे आदिवासी नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली.

 

उद्योजक दत्ताशेठ खांडेभराड व आखिल भारतीय निर्धन ग्राम सेवा ट्रस्ट पुणे यांच्या संयुक्त विद्यामाने कडाचीवाडी येथील आदिवासी बांधवांच्या ठाकरवाडीत नेत्र तपासणी शिबीर पार पडले.आदिवासी समाज हा समाजाच्या मुख्य प्रवाहापासून अलिप्त राहत असून त्यांना आरोग्याच्या सुविधा देऊन मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न खांडेभराड यांच्याकडून होत आहेत.

 

अनेक श्रीमंत माणसे वाढदिवस मोठ्या डामदौलाने आणि लाखोंचा खर्च करून साजरा करतात.पण काही व्यक्ती आला अपवाद आहेत.त्यातीलच एक म्हणजे उद्योजक दत्ताशेठ खांडेभराड आहेत.आपण समाजाचे काहीतरी देने लागतो हा उदात्त हेतू मनात ठेवून उद्योजक खांडेभराड यांनी आपली लाडकी कन्या कृष्णांगी हिच्या वाढदिवसानिमित्त गावातील आदिवासी बांधवांसाठी नेत्र तपासणी शिबीर आयोजित केले.या शिबिरात ठाकरवाडीतील जवळपास १५० लहान थोर अर्थात १८ ते ९० वयोगटातील नागरिकांची डोळ्यांची तपासणी करण्यात आली.

 

नेत्र तपासणी शिबीरात उपचारानंतर आवश्यकतेनुसार नंबर चश्मा यासह एक ब्लँकेट,एक सतरंगी व साडी देखील देण्यात आली.शिबिरात डोळ्यांची तपासणी आणि दैनंदिन वापरासाठी वस्तू चांगल्या दर्जाच्या मिळाल्याने ठाकरवाडीतील आदिवासी बांधवांनी आनंद व्यक्त केला.

 


समाजात चंगळवाद सुरु असल्याने काही लोक वाढदिवसावर कितीही खर्च करतात.आपला वाढदिवस समाजाच्या उपयोगी पडावा म्हणून वाढदिवसावर होणारा अनाठायी खर्च टाळून यावर्षी देखील तालुक्यातील अनेक शाळेतील दोन हजार विद्यार्थ्यांना मोफत वह्या,कंपास पेटी,पेन, पेन्सिल,खोडरब्बर,पाणी बॉटल आदी आवश्यक शालेय साहित्य वाटप केले.गरिबांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून सतत मदत करण्याचा प्रयत्न असतो.कडाचीवाडीच्या ठाकरवाडी जिल्हा परिषद शाळेतील सर्वच आदिवासी बांधवांच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप केले.यापूर्वी निवारा बालगृहातील विद्यार्थ्यांना किराणा साहित्याचे वाटप केले.अनेक समाज उपयोगी उपक्रम सुरु आहेत.विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची आवश्यकता असल्यास माझ्याशी थेट संपर्क करावा.
दत्ताशेठ खांडेभराड - भाजपा जिल्हा उपाध्यक्ष व उद्योजक