Khed | एसटी बसने नागरिकांच्या खडतर प्रवासाला अतुल देशमुखांचा मदतीचा हात

राजगुरुनगरच्या एस टी बसस्थानकातील नादुरुस्त एस टी बसच्या मदतीला अतुल देशमुख सोशल फाउंडेशन मदतीचा हात

Khed | एसटी बसने नागरिकांच्या खडतर प्रवासाला अतुल देशमुखांचा मदतीचा हात

 

राजगुरुनगर : पुण्याच्या ग्रामीण आदिवासी डोंगराळ भागात एसटी बस दुरुवस्थेमुळे फे-या रद्द होत असल्याने आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थांसह वयोवृद्धांच्या प्रवासाची हेळसांड होते यासाठी सामाजिक बांधिलकी जपत अतुल देशमुख सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून एसटी बसचे विविध स्पेअरपार्ट,पँनल देऊन एसटी बस दुरुस्तीसाठी मदतीचा हात देण्यात आला. यावेळी अतुल देशमुख सोशल फाउंडेशनचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत राजगुरुनगर बस आगारातील अधिकाऱ्यांकडे स्पेअरपार्ट,पँनल सुपूर्त करण्यात आले.

 

 

नादुरुस्त एसटी बस दुरुस्तीसाठी मदत होऊन ग्रामीण आदिवासी भागातील विद्यार्थी आणि नागरिकांच्या प्रवास सुखकर होण्यास मदत होणार आहे. यावेळी पुढील काळात आदिवासी व ग्रामीण भागातील एसटी बसच्या फेऱ्या वाढविण्यात याव्यात अशी मागणी राजगुरुनगर एसटी आगाराचे व्यवस्थापक यांना अतुल देशमुख सोशल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली.

 

 

खेड तालुक्यातील ग्रामीण भागात विद्यार्थी आणि विद्यार्थीनी मोठ्या संख्येने महाविद्यालयीन शिक्षणासाठी राजगुरुनगर येथे एसटी बसने प्रवास करत आहे मात्र एसटी बस बंद पडणे,नादुरुस्तीमुळे एकही विद्यार्थी महाविद्यालयात वेळेवर पोहचत नाही शिवाय परतीचा वेळेवर होत नसल्याने विद्यार्थींसह नागरिकांचा एसटी चा प्रवास दिवसेंदिवस खडतर होत होता. या नादुरुस्त एस टी बसला अतुल देशमुख सोशल फाउंडेशन च्या माध्यमातून बस दुरुस्तीसाठी मदत देण्यात आल्याने पुढील काळात एसटी बस सेवेत खंड पडणार नसल्याचा विश्वास प्रवाशांनी व्यक्त केला.