विद्यार्थ्यांसाठी दिवाळीत किल्ले बनवा स्पर्धा कौतुकास्पद : शरद बुट्टे पाटील

विद्यार्थ्यांसाठी दिवाळीत किल्ले बनवा स्पर्धा कौतुकास्पद : शरद बुट्टे पाटील

राजगुरूनगर : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष असलेल्या किल्यांची माहिती विद्यार्थीदशेत मिळणे आवश्यक आहे.विकास ठाकूर यांनी आयोजित केलेली किल्ले बनवा स्पर्धा कौतुकास्पद असल्याचे पुणे जिल्हा परिषदेचे गटनेते शरद बुट्टे पाटील यांनी सांगितले.
    पिंपरी बुद्रुक (ता.खेड) येथे किल्ले बनवा स्पर्धेचे बक्षीस वितरण व कोरोना काळात आरोग्य सेवा केलेल्या सर्वांचा कोरोना योद्ध्या म्हणून सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
      दिवाळीचे औचित्य साधून विकास ठाकूर मित्र परिवाराने किल्ले बनवा स्पर्धा आयोजित केल्या होत्या. परिसरातील २० गावातून आणि १६ वर्षाखालील २३४ स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतला.स्पर्धेचे बक्षीस वितरण पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य शरद बुट्टे पाटील, राजगुरूनगर आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.पुनम चिखलीकर,पंचायत समिती सदस्या ज्योती आरगडे,खेड तालुका भाजपा तालुकाध्यक्ष शांताराम भोसले,पिंपरी बुद्रुक गावच्या सरपंच देऊबाई वाळुंज, हभप सुप्रिया साठे-ठाकूर व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
         कोरोना संक्रमण काळात आरोग्य अधिकारी, अंगणवाडी सेविका,आशा वर्कर,ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीसपाटील अशा समाजातील अनेकांनी यशस्वी कार्य केलेल्यांना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची आरोग्य तपासणीसाठी धाडसी कार्य केलेल्यांचा विशेष गौरव झाला.किल्ले बनवा स्पर्धेत सहभागी बक्षीसपात्र ठरलेल्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.


प्रथम क्रमांक आदेश कोळेकर,द्वितीय क्रमांक यशोवर्धन कारले,तृतीय क्रमांक गौरव चौधरी,चतुर्थ क्रमांक प्रज्वल सावंत,पंचम क्रमांक श्रीओम वाळुंज या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.सर्वांना बक्षीस व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले.
   प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक माजी सरपंच विकास ठाकूर यांनी केले सूत्रसंचालन निवेदक आदेश टोपे यांनी केले.आभार ग्रामपंचायत सदस्य धोंडीबा वाळुंज यांनी मानले.
---------------------------------------------------