खेड पंचायत समिती उपसभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे बंडखोर सदस्य अमर एकनाथ कांबळे यांचा विजय. शिवसेनेचे मच्छिंद्र गावडे यांचा पराभव.

खेड पंचायत समिती उपसभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे बंडखोर सदस्य अमर एकनाथ कांबळे यांचा विजय. शिवसेनेचे मच्छिंद्र गावडे यांचा पराभव.

राजगुरूनगर - प्रतिनिधी
       खेड पंचायत समितीचे उपसभापतीपदाच्या निवडणुकीत पंचायत समितीतील शिवसेनेचे बंडखोर सदस्य अमर एकनाथ कांबळे यांना १४ पैकी १० मते पडल्याने त्यांची उपसभापती म्हणून निवड झाली.कांबळे यांच्या विरोधात शिवसेनेचे मच्छिंद्र गावडे यांनी अर्ज दाखल केला होता, परंतु त्यांना फक्त दोन मते पडल्याने पराभव झाला.या  उपसभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना झाला.शिवसेना व काँग्रेस मिळून  दोन पंचायत समिती सदस्य गैरहजर राहिले.
       उपसभापतीपदाचा राजीनामा चांगदेव शिवेकर यांनी दिल्याने रिक्त उपभापतीपदाची निवडणूक खेड पंचायत समितीच्या राजेशिवछत्रपती सभागृहात निवडणूक झाली. पीठासीन अधिकारी विक्रांत चव्हाण यांचे अध्यक्षतेखाली निवडणूक संपन्न झाली.गटविकास अधिकारी अजय जोशी यांनी चव्हाण यांना निवडणुकीसाठी मदत केली. 
         उपसभापतीपदाचे नामनिर्देशनपत्र शिवसेनेचे अमर कांबळे व मच्छिंद्र गावडे यांनी वेळेत दाखल केले.छावणीत अर्ज वैध ठरले आणि कुणीही माघार न घेतल्याने शेवटी निवडणूक घेण्यात आली.१४ पैकी दोन सदस्य गैरहजर राहिल्याने १२ सदस्यांनी मतदान केले.मतमोजणीत कांबळे  यांना सर्वाधिक १० तर गावडे यांना फक्त दोन मते पडली. मोठ्या फरकाने कांबळे विजयी झाले.निवडणूक प्रसंगी सभागृहात सभापती अरुण चौधरी,मावळते उपसभापती चांगदेव शिवेकर,पंचायत समिती सदस्य अंकुश राक्षे,सुभद्रा शिंदे,ज्योती अरगडे,नंदा सुकाळे,वैशाली जाधव,सुनीता सांडभोर,मंदा शिंदे व नवनिर्वाचित उपसभापती कांबळे असे १२ सदस्य हजर होते.अटकेत असल्याने सेनेचे सदस्य व माजी सभापती भगवान पोखरकर आले नाहीत.काँग्रेसचे अमोल पवार देखील निवडणुकीपासून अलिप्त राहिले.

     निवडीनंतर सभागृहात कांबळे यांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला.त्यानंतर पंचायत समितीच्या गेट समोर छोटी सभा झाली.त्यामध्ये राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर,अरुण चांभारे,सभापती अरुण चौधरी, अंकुश राक्षे,नवनिर्वाचित उपसभापती कांबळे यांसह अनेकांची भाषणे झाली.
----------------------------------------------------------------------
नवनिर्वाचित उपसभापती अमर कांबळे -

सर्वांच्या सहकार्याने मला उपसभापतीपदाची संधी मिळाली.सर्व सहकाऱ्यांच्या बरोबर राहून आणि सर्वांना विश्वासात घेऊन तालुक्याचा विकास केला जाईल.विकास करण्यासाठी सर्वांचे प्रयत्न महत्वाचे ठरणार असल्याचे नवनिर्वाचित उपसभापती अमर कांबळे यांनी सांगितले.
------------------------------------------------------------------------

फिक्स १० सदस्य

उपसभापतीपदाच्या निवडणुकीत सेनेचे पाच बंडखोर सदस्य,राष्ट्रवादीचे चार आणि भाजपचा एक असा १० जणांचा ग्रुप पंचायत समितीत तयार झाला आहे.हेच १० मतदान कांबळे यांना झाले.भाषणात सर्वांनी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे मार्गदर्शनाखाली तालुक्यात विकास सुरू असल्याचे सांगितले.
-------------------------------------------------------------------------------