शरद बुट्टे पाटील यांना आदर्श कार्यकर्ता पुरस्कार जाहीर. ४ डिसेंबरला पुणेच्या मॉर्डन महाविद्यालयात पुरस्काराचे वितरण.

शरद बुट्टे पाटील यांना आदर्श कार्यकर्ता पुरस्कार जाहीर. ४ डिसेंबरला पुणेच्या मॉर्डन महाविद्यालयात पुरस्काराचे वितरण.

राजगुरूनगर : प्रतिनिधी

पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे माजी सभापती स्व.रामभाऊ बराटे यांचे प्रथम पुण्यतिथीनिमित्त आदर्श कार्यकर्ता पुरस्कार दिला जाणार असून या वर्षीचा पहिला पुरस्कार पुणे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य व माजी सभापती श्री शरद आनंदराव बुट्टे पाटील (खेड तालुका )यांना जाहीर झाला आहे.

स्व.बराटे हे पुणे जिल्ह्यातील सर्व परिचित क्रियाशील कार्यकर्ते होते.पुणे जिल्हा परिषद,कृषी उत्पन्न बाजार समिती यासह त्यांनी अनेक छोटी-मोठी पदे भूषवली परंतु शेवटपर्यंत त्यांच्यातला कार्यकर्ता सक्रिय होता.म्हणूनच त्यांचे प्रथम पुण्यतिथीनिमित्त आदर्श कार्यकर्ता पुरस्कार २०२१ या वर्षापासून त्यांच्या मित्रा परिवाराने सुरू केला.११  हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

शरद बुट्टे पाटील हे गेली २५ वर्ष सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असून एक कार्यक्षम,हुशार,प्रभावी वक्ता आणि प्रशासकीय जाणकार कार्यकर्ता म्हणून ते जिल्हाभर ओळखले जातात.संघटन कार्य पासून पुणे जिल्हा परिषदेचे तीन वेळा सदस्य,कृषी व पशुसंवर्धन विभागाचे माजी सभापती,गटनेता म्हणून त्यांचे काम अतिशय प्रभावी राहिले आहे.यातूनच गेली १५ वर्षे ते यशदा या राज्याचे प्रशिक्षण संस्थेत व्याख्याते म्हणून राज्यभरातील लोकप्रतिनिधी व अधिकारी यांना मार्गदर्शन करत आहेत. सक्षम लोकप्रतिनिधी सर्वांगीण ग्राम विकास हे त्यांचे पुस्तक देखील प्रकाशित झाले आहे.

शरद बुट्टे पाटील यांनी खेड तालुक्यांमध्ये दिव्यांग नागरिक, आदिवासी ठाकर समाज,महिला आणि युवक यांचेसाठी अतिशय रचनात्मक काम उभे केलेले आहे.या दुर्लक्षित वर्गासाठी त्यांनी विविध अभियान राबवून योजनांची अंमलबजावणी देखील केलेली आहे. त्यांना यापूर्वी पुणे जिल्हा परिषदेचा आदर्श जिल्हा परिषद सदस्य, तसेच कार्यक्षम लोकप्रतिनिधी म्हणून पुरस्कार मिळाले आहेत.अशा अभ्यासू व सामान्य माणसांसाठी काम करणारे सक्षम आणि क्रियाशील कार्यकर्ता म्हणून बुट्टे पाटील यांचा पुरस्कार देऊन सन्मान होत आहे.

आदर्श कार्यकर्ता पुरस्कार शनिवार ४ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजता मॉडर्न महाविद्यालय सभागृह शिवाजीनगर पुणे ५ येथे आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे माजी मंत्री श्री हर्षवर्धन पाटील,उर्वरित महाराष्ट्र विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष श्री उल्हास दादा पवार, माजी खासदार श्री अशोकराव मोहोळ,माजी मंत्री श्री बाळासाहेब शिवरकर यांचे शुभ हस्ते देण्यात येणार आहे.

------------------------------------------------------------------------