खेड पंचायत समितीच्या उपसभापतीपदी राष्ट्रवादीच्या वैशाली गव्हाणे
खेड पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे बहुमत असतानाही राष्ट्रवादीचे सभापती आणि उपसभापती
राजगुरूनगर : प्रतिनिधी
खेड तालुक्यातील दावडी गणातील राष्ट्रवादी काॅग्रेसच्या पंचायत समिती सदस्या सौ.वैशाली संतोषशेठ गव्हाणे यांची खेड पंचायत समितीच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली.पंचायत समितीत सभापती पदानंतर उपसभापतीपद देखील राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्याने तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील तालुक्यात पॉवरफुल ठरत आहेत.
खेड पंचायत समितीत शिवसेना ८,राष्ट्रवादी काँग्रेस ४,भाजपा १ आणि राष्ट्रीय काँग्रेस १ असे १४ सदस्यांचे बलाबल आहे.पंचायत समितीवर शिवसेनेची निनिर्वाद सत्ता होती.परंतु शिवसेनेचे ५ सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मोहिते पाटील यांच्या गळाला लागले.त्यामुळे त्यांनी पंचायत समितीची सत्ता शिवसेनेकडून खेचली आहे.तालुक्यातील अनेक राजकीय सत्तास्थाने मोहिते पाटील यांच्या ताब्यात आहेत.तीन पक्षांची महाविकास आघाडी राज्यात असल्याने सेनेला देखील पुढील काही दिवसात सभापतीपद मिळणार असल्याचे स्पष्ट आहे.
राज्यात महाविकास आघाडी असल्यामुळे त्यांनी सत्तेचे राजकारण खेळत सभापतीपद आपल्या राष्ट्रवादी कडे घेतल्यानंतर उपसभापतीपद अवघ्या काही दिवसांसाठी सेनेकडे दिले.सेनेचे उपसभापती अमर कांबळे यांचा राजीनामा घेऊन त्यांच्या जागी आता राष्ट्रवादीच्या सदस्या वैशाली गव्हाणे यांची खेड पंचायत समितीच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली.आता पाहूया सभापती अरुण चौधरी यांचा राजीनामा नंतर सुनीता सांडभोर की वैशाली जाधव यापैकी कोणाला सभापती पदाची संधी मिळणार याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष वेधणार हे तितकेच सत्य आहे.
उपसभापती पदाच्या नामनिर्देशन पत्रावर सूचक म्हणून सभापती अरुण चौधरी यांनी स्वाक्षरी केली.यावेळी पं.स. सदस्य उपस्थित होते.
------------------------------------------------------------------------
