खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व विद्यमान संचालक अशोकदादा राक्षे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

खेड तालुक्यातील अनेक गावचे सरपंच,उपसरपंच,सदस्य, सोसायटी अध्यक्ष,उपाध्यक्ष,संचालक आणि बैलगाडा मालक संघटना, यांचेसह अनेकांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून तर काहींनी मोबाईलद्वारे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व विद्यमान संचालक अशोकदादा राक्षे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

राजगुरूनगर : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व विद्यमान जेष्ठ संचालक आणि राक्षेवाडी ग्रामपंचायतीत सलग ३५ वर्षात गावचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य म्हणून गावचा कारभार संभाळणारे अशोकदादा राक्षे यांच्या वाढदिवसानिमित्त राक्षेवाडी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला.तालुक्यातील अनेक अनेक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

वाढदिवसानिमित्त अशोकदादा राक्षे यांचा राक्षेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच सुरेखा राक्षे,उपसरपंच मच्छिन्द्र राक्षे, ग्रामपंचायत सदस्य रविराज राक्षे,जितेंद्र सांडभोर,सविता राक्षे,श्रद्धा सांडभोर,वैजियंता थिटे,चांगुणाबाई थिटे,ग्रामसेवक तुषार साळुंके,पोलीसपाटील पप्पूकाका राक्षे,ग्रामपंचायत कर्मचारी दत्ता राक्षे, विशाल राक्षे,शंकर राक्षे,नितीन राक्षे व ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन ग्रामपंचायत कार्यालयात भव्य सत्कार केला.यावेळी फटाक्यांची अतिशबाजी करण्यात आली.त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

तसेच राजगुरूनगर बाजार समितीच्या सभागृहात सभापती कैलास लिंभोरे,उपसभापती विठ्ठल वनघरे,सचिव बाळासाहेब धंद्रे,बाजार समितीचे सर्व संचालक,माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र राक्षे,शांताराम चव्हाण,अनिलबाबा राक्षे,रोहिणी राक्षे, तनुजा घनवट,बाबाजी काळे,पंचायत समिती माजी उपसभापती सतीश राक्षे,ज्योती अरगडे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, शहराध्यक्ष सुभाष होले,संजय घनवट,नगरसेवक अरुण गायकवाड, अँड अनिल राक्षे,माजी सभापती नवनाथ होले,राजगुरूनगर बँकेचे जेष्ठ संचालक किरण आहेर,अरुण थिगळे, आदींसह तालुक्यातील अनेक गावचे सरपंच,उपसरपंच,सदस्य, सोसायटी अध्यक्ष,उपाध्यक्ष,संचालक आणि बैलगाडा मालक संघटना यांचेसह अनेकांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून तर काहींनी मोबाईलद्वारे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

अशोकदादा राक्षे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असून आमदार दिलीप मोहिते यांचे कट्टर समर्थक म्हणून तालुक्यात परिचित आहेत.अशोकदादा हे जरी राष्ट्रवादीचे असले तरी त्यांचा मित्र परिवार सर्वच पक्षात आहे.राष्ट्रवादी सह अनेक पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी त्यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा देत त्यांच्यावर सकाळपासून शुभेच्छांचा वर्षाव केला.अशोकदादा यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा झाला.