कोरेगाव बुद्रुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ नम्रता तानाजी गोगावले यांची बिनविरोध निवड
राजगुरूनगर : खेड तालुक्यातील कोरेगाव बुद्रुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ नम्रता तानाजी गोगावले यांची बिनविरोध निवड झाली.निवडीनंतर त्यांचा सत्कार सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आला.
ठरल्याप्रमाणे मुदतीत रोहित डावरे पाटील यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिला होता.त्यामुळे रिक्त पदाची निवडणूक ग्रामपंचायतीच्या सभागृहात सरपंच काजल लगाडे यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. निर्धारित वेळेत एकमेव नम्रता गोगावले यांचेच नामनिर्देशनपत्र आल्याने त्यांची बिनविरोध निवडीची घोषणा सरपंच लगाडे यांनी सदस्यांच्या उपस्थितीत सभागृहात केली.निवडीनंतर डावरे यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार सर्वांच्या उपस्थितीत करण्यात आला.
निवडणूक प्रसंगी मावळते उपसरपंच रोहित डावरे पाटील,ग्रामपंचायत सदस्य कुंदा डावरे,कामिना गोगावले, महादेव डावरे,माजी उपसरपंच शिवाजी डावरे पाटील, सोसायटी संचालक गणेश गोगावले,महिंद्र डावरे पाटील, माजी सरपंच अर्जुन गोगावले,तानाजी गोगावले,संतोष डावरे आदी यावेळी उपस्थित होते.
